भारतात ५ जी सेवेचा शुभारंभ झाल्यानंतर ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी दूर संचार कंपन्यांची लगबग सुरू झाली आहे. अॅपल देखील आपल्या ग्राहकांना उत्तम ५ जी सेवा अनुभवता यावी यासाठी एक सॉफ्टवेअर अपडेट उपलब्ध करणार आहे. भारतातील आयफोनला ५ जी सेवा देण्याकरिता सक्षम करण्यासाठी अॅपल डिसेंबर महिन्यात एक सॉफ्टवेअर अपडेट जारी करणार आहे.
शासन स्तरावर हालचाल
देशात ५ जी सेवेची सुरुवात झाली आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या कंपन्यांनी काही मोजक्या शहरांमध्ये आपली ५ जी सेवा सुरू केली आहे. ग्राहकांना चांगली सेवा मिळावी यासाठी शासनस्तरावर देखील हालचाली होत आहेत. भारतात ५ जी अपडेटला कंपन्यांनी प्राध्यान्य द्यावे यासाठी उच्च सरकारी अधिकारी अॅपल, सॅमसंग आणि इतर फोन निर्मिती कंपन्यांना भेट देणार आहे.
(6.1 इंच स्क्रिनसह लाँच होऊ शकतो नवा IPHONE SE 4, लिकमधील ‘या’ माहितीमुळे उत्सुकता शिगेला)
ग्राहकांना सर्वोत्तम ५ जी सेवा देण्यासाठी आम्ही भारतातील आमच्या भागिदारांसोबत काम करत आहोत. एका सॉफ्टवेअरद्वारे फोनमधील ५ जी फीचर सुरू होईल आणि ते डिसेंबर महिन्यात ग्राहकांसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती अॅपने बुधवारी एका निवेदनातून दिली.
अॅपल कंपनी आयफोन वापरकर्त्यांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असते. याच कराणामुळे तिला भारतातील उपलब्ध सेवांची चाचणी करण्यात आणि त्या फोनमध्ये कशा काम करतील हे जाणून घेण्यासाठी वेळ लागेल. सध्या आयफोन १३, १४, १२ सिरीज फोन आणि आयफोन एस ई (तिसरी पिढी) मध्ये ५ जी फीचर उपलब्ध आहे. या फोन्सना डिसेंबरमध्ये सॉफ्टवेअर अपडेट मिळेल.