Apple WWDC 2024 Updates: ॲपल (Apple) कंपनीचा वर्ल्ड वाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स काल १० जून रोजी ॲपल पार्क, क्युपर्टिनो, कॅलिफोर्निया येथे घेण्यात आली. लाईव्ह इव्हेंट ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आला मात्र यूजर्ससाठी हा इव्हेंट ऑनलाईन पद्धतीनेच ठेवण्यात आला होता. तर या लाईव्ह इव्हेंटमध्ये कंपनीने कोणत्या नवीन सॉफ्टवेअर आणि अपडेट्सची घोषणा केली आहे यावर एक नजर टाकुयात.

व्हिजन ओएस२ (visionOS2) :

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते, एकनाथ शिंदे दिलदार माणूस-राज ठाकरे
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
My Name The Night Agent Vincenzo The Glory
नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे? रविवारी पाहा ‘या’ जबरदस्त सस्पेन्स-थ्रिलर वेब सीरिज, वाचा यादी
New Maruti Suzuki Dzire earns 5-star rating in Global NCAP safety test Delivers 25.71 Kmpl 2024 Maruti Dzire features and engine
New Maruti Suzuki Dzire: मारुतीने केली सगळ्यांची बोलती बंद! लॉंच होण्यापूर्वीच डिझायरला मिळालं ५-स्टार ग्लोबल NCAP रेटिंग
Maharashtra Election 2024 BJP mahayuti alliance Banner Fact Check post
“गुजरातच्या प्रगतीसाठी भाजपा-महायुतीला मतदान करा” महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान पोस्टर व्हायरल? पण पोस्टरमधील दावा खरा की खोटा? वाचा
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Terrifying Video of father saving his children life from accident video went viral on social media
हा VIDEO पाहून कळेल आयुष्यात वडिलांचं असणं किती गरजेचं, बापाने मरणाच्या दारातून लेकराला आणलं परत, पाहा नेमकं काय घडलं
JEE Advanced 2025 New Eligibility Rules
JEE Advanced 2025 : जेईई ॲडव्हान्स्डच्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा; आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

डेटा विश्लेषणापासून ते वैद्यकीय सिम्युलेशनपर्यंत व्हिजन प्रोमध्ये (Vision Pro) काही ग्राउंडब्रेकिंग ॲप्स आहेत. हे ॲप्स visionOS ( visionOS) सह युजर्स पर्यंत पोहचवणे शक्य झाले आहेत. नवीन व्हिजन ओएस२ (visionOS2) अधिक पॉवरफुल API सह येतो. visionOS 2 युजर्सना 2D फोटोजना 3D spatial फोटोंमध्ये बदलण्याची परवानगी देतो. युजर्स इतर व्हिजन प्रो वापरकर्त्यांसह फोटो आणि पॅनोरामा पाहण्यासाठी शेअरप्ले देखील वापरू शकतात. व्हिजन ओएस२सह ॲपलचे इमर्सिव्ह व्हिडीओ, Apple चे 180 डिग्री 3D 8K व्हिडीओ फॉरमॅट इमर्सिव्ह व्ह्यूइंगला पुढील स्तरावर घेऊन जाणार आहेत . नवीन वर्कफ्लो तयार करण्यासाठी ॲपल देखील Blackmagic बरोबर पार्टनरशिप करत आहे.

आयओएस १८ ( iOS 18) :

iOS 18 सह आता युजर्स त्यांच्या आयफोन्सवर नवीन वॉलपेपर, आयकॉन्स आणि विजेट (widget) वैयक्तिक कस्टमाईज्ड करू शकतात ; ज्यात साइड आणि डॉक प्लेसमेंटचा समावेश आहे. वॉलपेपर स्कीम्सद्वारे सुचवलेले ॲप आयकॉन टिंट कलर्ससाठी नवीन डार्क मोड लुक ऑफर करते आहे. याशिवाय, कंट्रोल सेंटरला काही प्रमुख अपग्रेड देखील मिळत आहेत जसे की, मीडिया प्लेबॅक, होम कंट्रोल्स आणि मल्टिपल कंट्रोल ग्रुपसह स्वाइप करण्याची परवानगी इत्यादी. हे अपडेट एक प्रकारे Android च्या मटेरिअल यू डिझाइन लँगव्हेजची आठवण करून देते आहे. iOS 18 काही प्रायव्हसी फीचर्स देखील घेऊन आला आहे. युजर्स एखादा पिन किंवा फेसआयडीसह ॲप्स लॉक करू शकणार आहात. याशिवाय तुमच्या डिव्हाईजमध्ये अनधिकृत ॲक्सेसला प्रतिबंध घालून तुमचा डेटा, तुम्ही सर्च केलेल्या गोष्टी आणि इतर ॲप्सपासून सुरक्षित ठेवेल. तसेच युजर्स लॉक फोल्डरमध्ये त्यांचे ॲप्स लपवू शकणार आहेत.

हेही वाचा…Apple Day Sale : कमी पैशात Apple च्या वस्तू खरेदी करण्याची संधी; आयफोनसह ‘या’ चार प्रोडक्टवर मिळणार जबरदस्त ऑफर

मेल ॲप आणि गेम मोड अपडेट (Updates to Mail App and Game Mode) :

iOS 18 नवीन ऑर्गनायझेशनल फीचर्ससह अपडेट केला आहे ; ज्यात युजर्ससाठी प्रायमरी कॅटेगिरी देण्यात आली आहे. या कॅटेगिरीमध्ये वेळेवत मेसेज पाठवणे (शेड्युल करणे), खरेदी आणि जाहिराती आदींचा समावेश आहे. ॲपल तुमच्या फोनवर ॲप्सना पाठवणाऱ्या ईमेलची लिंक देखील देईल ; ज्यामुळे तुम्हाला विशिष्ट कंपन्यांचे संदेश रीऑर्गनायझ, अर्चिव किंवा डीलिट करता येतील.

वॉच ओएस ११ अपग्रेडस (WatchOS 11 upgrades) :

आरोग्य आणि फिटनेस ट्रॅकिंग सुधारण्यासाठी वॉच ओएस ११ अनेक नवीन फीचर्स ऑफर करते. नवीन Vitals ॲप वापरकर्त्यांना हृदय गती तपासून देईल. सायकल ट्रॅकिंगमध्ये आता गर्भवती महिलांसाठी, गरोदर राहण्याचं वेळापत्रक आणि हाय हार्ट रेट, ट्रेनिंग मोड, वर्कआउटचे परीक्षण करण्यासाठी नवीन अल्गोरिदम आणि सेन्सर डेटा तर युजर्सना त्यांचे वर्कआउट रेट करण्यास अनुमती सुद्धा देणार आहे.

ॲपल इंटेलिजन्स (Apple Intelligence has personal context at its core) :

ॲपल इंटेलिजन्स, आयफोन, आयपॅड आणि मॅक सह काम करेल. ॲपल इंटेलिजन्स युजर्सना भाषा आणि मजकूरापासून सुरुवात करून वैयक्तिक संदर्भ समजावून देईल. Apple Intelligence नोटिफिकेशन, प्रायॉरिटीज टास्क ( prioritise tasks) आणि मजकूर पुन्हा लिहून तो प्रूफरीड करून तुम्हाला हवा तसा सारांशित करून देण्यास मदतही करेल.

ॲपल इंटेलिजन्स संबंधित डेटा प्रदान करण्यासाठी युजर्सना दैनंदिन कामात मदत करते आणि हे ॲपल सिलिकॉन चिप्स जसे की, A17 Pro आणि M फॅमिली वापरून केले जाते. ॲपल ऑन-डिव्हाइस प्रक्रियेसह प्रायव्हसीवर भर देऊन वैयक्तिक डेटा सुरक्षित राहील याची खात्री करून देईल. कॅलेंडर इव्हेंट आणि ट्रॅफिक यासारखे संदर्भ समजून घेऊन, ते शेड्युलिंगसारख्या निर्णयांमध्ये मदत करू शकते. तसेच एखादा विशिष्ट फोटो शोधणे किंवा पॉडकास्ट प्ले करण्यातही तुमची मदत करेल.

सिरी होणार आणखीन हुश्शार (Siri gets smarter) :

ॲपल असिस्टंट आता ऑन-स्क्रीन जागरूकता वाढवणार आहे ; ज्यामुळे युजर्सना मजकूरांद्वारे थेट कारमध्ये माहिती जोडता येईल. सिरी ॲपल प्रोडक्ट्सचे ज्ञान अधिक समजून घेईल. म्हणजेच Apple म्हणते की ॲपल इंटेलिजन्ससह सिरी चुकीच्या बोललेल्या कमांड्स काळजीपूर्वक हाताळेल आणि वापरादरम्यान फोनच्या कडा (edges) ला आकर्षक लाईट सुद्धा प्रदान करेल.