WWDC 2024 Apple Event Streaming : ॲपल कंपनीची वार्षिक वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) घेण्यात येणार आहे. ॲपल पार्क, क्युपर्टिनो, कॅलिफोर्निया येथे घेण्यात येणाऱ्या या कॉन्फरन्समध्ये आयफोनसाठी नेक्स्ट जनरेशन ऑपरेटिंग सिस्टीम, आयपॅड, मॅकसह कदाचित एआय मॅजिकबद्दल घोषणा करण्यात येणार आहे, असे समजते.

यंदा जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे या कॉन्फरन्सचे विशेष आकर्षण ठरण्याचा अंदाज आहे. यामध्ये ॲपल शक्यतो त्यांच्या पॉवर्डबाय जेन-एआय टूल्सवर चालणारे विविध साधनांबद्दल घोषणा करू शकतो.

artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ai complexity
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता नियमनाची किचकट प्रक्रिया
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
positive artificial intelligence
कुतूहल : भारताला गरज सकारात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेची!
Maharashtra News Updates
Maharashtra Assembly Special Session : पराभूत उमेदवारांची शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक सुरू
Revealing Interview Yuval Noah Harari Problem Crisis Artificial Intelligence
सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!
Loksatta kutuhal The journey of artificial intelligence in India
कुतूहल: भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेची वाटचाल

WWDC 24 ही कॉन्फरन्स मोजक्या मीडिया, विश्लेषक आणि डेव्हलपर्ससाठी असणार आहे. याचे थेट प्रक्षेपण हे यूट्यूब, एक्स [पूर्वीचे ट्विटर] आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार आज, [१० जून] [IST] रात्री १०:३० वाजता सुरू होणार असून, किमान एक तास सुरू राहील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या वेळेत ॲपल आपल्या आगामी iOS 18, iPadOS 18, macOS 15, watchOS 11 आणि यांसह इतर अनेक उत्पादनांबद्दल सांगून, प्रामुख्याने AI वैशिष्ट्ये हायलाईट करतील.

बहुदा, क्युपर्टिनो जायंट त्यांचे एआय फीचर हे ‘ॲपल इंटेलिजन्स’ म्हणून ब्रँड करू शकतात, अशादेखील चर्चा आहेत. यामध्ये कदाचित चॅट-जीपीटीसारखे संभाषण कौशल्य असणाऱ्या सुधारित सीरिजचा समावेश असू शकतो. त्याचबरोबर, जनरेटिव्ह एआय क्षमतेसह नोट्स, म्युझिक, व्हॉईस मेमो आणि यांसारख्या इतर बऱ्याच गोष्टी सुपरचार्ज करण्याची क्षमता अपेक्षित आहे.

हेही वाचा : Googleच्या जेमिनी-AI सह करता येईल ‘जेवणाचे प्लॅनिंग, व्हिडीओवरून शोध’! काय आहेत भन्नाट फीचर्स, पाहा

डिव्हाईस आणि सेवांनुसार, काही ऑन-डिव्हाइससाठी, एआय अनुभवांसाठी न्यूरल प्रोसेसिंग युनिटचा (NPU) वापर अपेक्षित आहे; तर इतर डिव्हाईस क्लाउडवर अवलंबून राहणे अपेक्षित आहे. आयफोनवर एआयचा अनुभव येण्यासाठी, ॲपल हे ओपन एआयसह मिळून काम करत असल्याचेदेखील ब्लूमबर्गच्या एका अहवालावरून समजते. एआयचा वापर करून, विविध गेम्स तयार करण्यासाठी डेव्हलपरना मदत करण्याकरीता एआय सपोर्टेड Xcode सारखी नवीन साधने सादर करण्याची ॲपलकडून अपेक्षा आहे.

मात्र, केवळ आयफोन १५ प्रो सीरिजसारख्या काही डिव्हाईसमध्येच संपूर्ण एआय फीचर्सचा समावेश करण्यात येऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येतो. परंतु, केवळ आयपॅड आणि मॅक, M1 किंवा नवीन चिप असलेल्या डिव्हाइसेसना ‘ॲपल इंटेलिजन्स’चा फायदा होऊ शकतो.

या कॉन्फरन्सनंतर लवकरच ॲपल सॉफ्टवेअरच्या सुरुवातीच्या आवृत्या डेव्हलपर्ससाठी रिलीज करणे अपेक्षित असून, त्यांना त्याचा फायदा हा पुढे येणाऱ्या इतर ॲप्स आणि सेवांच्या अपडेट्स ऑप्टिमाइझसाठी करता येईल, अशी माहिती द इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून समजते.

Story img Loader