Apple CEO Tim Cook Daily Morning Routine: Apple ही जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असून टिम कुक (Apple CEO Tim Cook) हे त्या कंपनीचे सीईओ आहेत.अॅपलचे स्मार्टफोन जगभरात लोकप्रिय आहेत. एवढ्या मोठ्या कंपनीच्या सीईओचा दिवस कसा सुरू होतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? कदाचित तुम्हा सर्वांना वाटेल की, मोठ्या कंपन्यांचे सीईओ त्यांच्या दिवसाची सुरुवात व्यायाम, योगा किंवा जिमने करतात. पण अॅपलचे सीईओ टिम कुक यांच्याबाबतीत असे नाही. टीम कूक त्यांच्या दिवसाची सुरुवात वेगळ्या पद्धतीने करतात, त्यांची ही सुरुवात पाहून तुम्हीही त्यांच्या प्रेमात पडाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीम कुक अशाप्रकारे करतात त्यांच्या दिवसाची सुरुवात

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अॅपलचे सीईओ टिम कुक रोज पहाटे ५ वाजता उठतात आणि उठल्यानंतर सर्वप्रथम ते ग्राहकांच्या प्रतिक्रिया आणि ई-मेल वाचतात. म्हणजेच, टीम कूक त्यांच्या दिवसाची सुरुवात अॅपलच्या उत्पादनावर लोक काय प्रतिक्रिया आणि मत देत आहेत, याने आपल्या दिवसाची सरुवात करतात. पण टिम कुक रोज सकाळी ते का वाचतात? यालाही त्यांनी उत्तर दिले आणि सांगितले की, सकाळी लवकर ग्राहकांचे अभिप्राय वाचून त्यांना प्रेरणा मिळते आणि लोकांच्या फीडबॅकमुळे त्यांना नवीन उत्पादनांवर अधिक चांगले काम करण्यास मदत होते.

(हे ही वाचा : खुशखबर! नुकताच लाँच झालेला Google Pixel 7 खरेदी करा स्वस्तात, पाहा कुठे मिळतेय शानदार डील)

एक उदाहरण देताना, टिम कुक म्हणाले की, ते एक पुनरावलोकन वाचत होते ज्यामध्ये एका व्यक्तीने सांगितले की, आयफोन 14 च्या क्रॅश डिटेक्शन वैशिष्ट्यामुळे, त्याच्या ड्रायव्हरला एपिलेप्टिक फिट असल्यामुळे तो कठीण काळात वाचला. तुम्हाला सांगतो, Apple ने iPhone 14 मध्ये इमर्जन्सी सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी दिली आहे. अशा परिस्थितीत, कोणत्याही क्षेत्रात नेटवर्क नसल्यास, या वैशिष्ट्याच्या मदतीने, आपण एखाद्याशी संपर्क साधू शकता. मात्र, भारतात येणाऱ्या आयफोनमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही. यासोबतच टीम कूकने असेही सांगितले की, जर तुम्ही माझ्यासारख्या व्यवसायाशी संबंधित असाल तर ग्राहकांच्या प्रतिक्रिया वाचणे खूप महत्त्वाचे आहे कारण यामुळे कंपनी आणि समाजाला पुढे नेण्यात मदत होते.

IOS 17 ची होणार लवकरच घोषणा

सध्या, अॅपलने ५ जून ते ९ जून या कालावधीत होणाऱ्या वार्षिक वर्ल्ड वाइड डेव्हलपर कॉन्फरन्सवर लक्ष केंद्रित केले आहे. या कार्यक्रमात कंपनी IOS 17 आणि इतर सॉफ्टवेअर सादर करणार आहे. या इव्हेंटमध्ये Apple प्रत्येकामध्ये १५ इंच मॅकबुक एअर देखील ठेवणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apples ceo tim cook might be reading your reviews about the devices that you buy from them pdb
First published on: 08-04-2023 at 18:39 IST