ॲपल ही कंपनी जगातील सगळ्यात टेक कंपन्यांपैकी एक आहे. ॲपलचे सीईओ टिम कुक आहेत. जगभरात या कंपनीचे स्मार्टफोन, स्मार्टवॉच लोकप्रिय आहेत; तर आता स्मार्टफोन, स्मार्टवॉच डिझाइन करणारे प्रमुख नवीन वर्षात कंपनी सोडून जाणार आहेत. आयफोन आणि ॲपल स्मार्टवॉच या ॲपलच्या प्रोडक्टचे प्रमुख डिझायनर टँग टॅन यांंनी येत्या फेब्रुवारीमध्ये कंपनी सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. ॲपल कंपनीने खुलासा केला आहे की, टँग टॅन या प्रमुख सदस्याच्या जाण्याने कंपनीच्या डिझाइन टीमला मोठा धक्का बसणार आहे. ॲपलच्या सर्वात महत्वाच्या उत्पादनांबद्दल महत्वाचे निर्णय घेणे किंवा ॲपल वॉच, एअरपॉड्स आदी इतर उत्पादनांच्या डिझाइनवर टँग टॅन यांचा मोलाचा वाटा असायचा.

टँग टॅनची ॲपल कंपनीतील भूमिका :

semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
delhi ganesh demise
दाक्षिणात्य अभिनेते दिल्ली गणेश यांचं वृद्धापकाळाने निधन, हवाई दलातील सेवेनंतर सिनेसृष्टीत केलं होतं पदार्पण; ‘अशी’ होती कारकीर्द
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या

टँग टॅनच्या टीमचे उत्पादन फिचरवर नियंत्रण होते, ज्यामध्ये डिव्हाइसचे स्वरूप आणि ते कसे तयार केले जायचे, या सर्व गोष्टींचा समावेश असायचा. टँग टॅनने एअरपॉड्स आणि ॲपल वॉचला ॲपलच्या प्रमुख उत्पादनांमध्ये बदलण्यास मदत केली. फेब्रुवारी २०४ मध्ये जेव्हा टँग टॅन
कंपनी सोडून जातील, तेव्हा कंपनीला तिच्या सर्वात महत्त्वाच्या उत्पादनांमध्ये बदल करावा लागेल आणि काही नवीन योजना आखाव्या लागतील. टँग टॅन यांनी थेट जॉन टर्नसच्या हाताखाली काम केले आहे, जे हार्डवेअर इंजिनिअरिंगमध्ये सिनिअर प्रेसिडेंट आहेत.

हेही वाचा…टाटा कंपनी उभारणार दुसरा आयफोन कारखाना! ‘एवढ्या’ कामगारांना मिळणार रोजगाराच्या संधी…

कंपनीत टँग टॅन यांची भूमिका कोण घेईल?

ॲपलचे सीनियर वाईज प्रेसिडेंट जॉन टर्नस यांनी सांगितले आहे की, टँग टॅन यांनी कंपनी सोडून दिल्यानंतर त्यांच्या जबाबदाऱ्या कंपनीतील (Zorkendorfer’s team ) झॉर्कनडॉर्फर टीमच्या इतर सदस्यांमध्ये विभागल्या जातील.

या आठवड्याच्या सुरुवातीला कंपनीने सांगितले की, आयफोनची मल्टीटच स्क्रीन, टच आयडी आणि फेस आयडी यांसारख्या प्रमुख तंत्रज्ञानावर काम करणारे स्टीव्ह ॲपलमधून निवृत्त होणार आहेत. तसेच २०१९ मध्ये ॲपलमध्ये मुख्य डिझायनर राहिलेल्या Jony Ive ने आयफोनसह ३० वर्ष काम केल्यानंतर कंपनी सोडली होती, तर आता आयफोन आणि ॲपल स्मार्टवॉचचे प्रमुख डिझायनर टँग टॅन येत्या फेब्रुवारीमध्ये कंपनी सोडून जाणार आहेत.