स्मार्टफोन आणि इंटरनेटचे जग वाटतं तितके सोपे नाही आहे. येथे प्रत्येक क्षणी आपल्यावर नजर ठेवली जाते. प्रत्येक वेळी तुमच्यावर नजर ठेवणे हे जासूसी करण्याचा उद्देश असेलच असं नाही. अनेकवेळा लोकांची अशी तक्रार असते की त्यांना फोनमध्ये Adult Ads किंवा सेक्सुअल कंटेंटच्या नोटिफिकेशन येतात. Google किंवा इतर अॅप्स तुम्हाला अशा नोटिफिकेशन पाठवतात का? नाही असं अजिबात नाही. वास्तविक, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, Google आणि इतर अॅप्स तुम्हाला वापरकर्त्याच्या वर्तनानुसार जाहिराती दाखवतात. म्हणजेच तुमच्या वागण्यातून त्यांना अशा प्रकारचा आशय दाखवला असावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Adults Adds का दिसतात? 

Google किंवा Facebook सारख्या इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहता त्या जाहिराती अल्गोरिदम फॉलो करतात. हे अल्गोरिदम वापरकर्त्याची निवड, मीडिया वापर आणि पसंती आणि टिप्पण्यांवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, तुम्ही अनावधानाने किंवा स्वच्छेने अशी कोणतीही वेबसाइट किंवा जाहिरात पाहिली असेल, जी Adults असेल. यानंतर, तुमचे वर्तन मशीनच्या अल्गोरिदममध्ये अपडेट होते आणि तुम्हाला अशा जाहिराती दिसू लागतात.

( हे ही वाचा: १६५ रुपयांमध्ये मिळतोय Nokia 6310 मोबाईल; आत्ताच खरेदी करा)

Instagram ते Youtube वर असंच करतात काम

हे अल्गोरिदम केवळ तुम्ही पाहता त्या जाहिरातींसाठीच नाही तर तुम्ही सोशल मीडियावर पाहत असलेल्या कंटेंस्ट्सवर देखील कार्य करते. काही लोक तक्रार करतात, की त्यांना एकाच प्रकारचे रील किंवा पोस्ट सोशल मीडियावर दिसतात. याचे कारण स्पष्ट आहे. ज्या काही गोष्टी तुम्ही पाहतात, त्यामध्ये काहीतरी नक्कीच असेल जे तुम्हाला आवडले असेल आणि तुम्ही ते लाईक केले असेल. 

नोटिफिकेशन्सचा काय विषय आहे? 

तुमच्याकडे येणाऱ्या नोटिफिकेशन्सचे प्रकरण थोडे वेगळे आहे. काही सूचना Google किंवा Chrome वरून येतात. या सूचना तुमच्या शोध पद्धतीवर आधारित असतात, तर काही सूचना तुम्हाला वेबसाइटवरून पाठवल्या जातात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला Adults Ads दिसत असतील, तर तुम्ही अशा वेबसाइटला भेट दिली असेल आणि त्यांच्या सूचनांचे सदस्यत्व घेतले असेल. असे अनेक लोकांसोबत घडते. नोटिफिकेशन सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही ते सहज बंद करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are you getting adults ads too this is the reason why google is sending such notifications gps
Show comments