OpenAI ने आपला ChatGpt हा चॅटबॉट लॉन्च केला आहे. हा एक कृत्रिम चॅटबॉट आहे. अनेक टेक कंपन्या AI तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फार उपयोग अनेक क्षेत्रांमध्ये होऊ शकतो. तसेच AI हे वैद्यकीय क्षेत्रातसुद्धा मोठी भूमिका बजावू शकतो. हे सांगण्याचे कारण म्हणजे नुकताच एक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये AI आधारित सॉफ्टवेअरच्या मदतीने महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सर आढळून आला आहे. यामध्ये एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे नॉर्मल एक्स-रेमध्ये रेडिओलॉजिस्टला सर्वकाही नॉर्मलच दिसत होते. मात्र Ai सॉफ्टवेअरमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आढळून आला आहे.
न्यूयॉर्क टाईम्समसधील बातमीनुसार, Bács-Kiskun काउंटी हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉ. Eva Ambrozay यांनी सॉफ्टवेअरच्या मदतीने एका महिलेमध्ये असणाऱ्या स्तनाच्या कर्करोग शोधला आहे. त्यांनी स्कॅनमध्ये लहान लाल वर्तुळे आढळली जी नॉर्मल एक्स-रे मध्ये दिसत नव्हती. हंगेरी देशामध्ये ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबीर मोठ्या प्रमाणावर राबवले जाते. दरवर्षी येथे सुमारे ५ हॉस्पिटल आणि क्लिनिकमध्ये ३५,००० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये AI सॉफ्टवेरची मदत घेतात , ज्याची सुरुवात २०२१ पासून झाली आहे.
हेही वाचा : आनंदाची बातमी! BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस, ‘या’ राज्यापासून होणार सुरुवात
एका डॉक्टरांनी न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना सांगितले की, AI च्या मदतीने मानवी चुकांचे प्रमाण कमी होऊ शकते. अनेक वेळा रेडिओलॉजिस्टमध्ये अनेक किरकोळ गोष्टी चुकतात ज्यामुळे रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र आता AI च्या मदतीने या गोष्टी सुधारल्या जाऊ शकतात तसेच AI हे आरोग्य क्षेत्रात मोठी भूमिका बाजू शकते. AI हे डॉक्टरांची जागा घेऊ शकत नाही असे AI च्या तज्ञाने न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना सांगितले. मात्र AI च्या मदतीने रुग्णाची अधिक चांगल्या व अचूक पद्धतीने मदत केली जाऊ शकते.