Apple ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. प्रत्येकाला अ‍ॅपल कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरण्याची इच्छा असते. जर का तुम्ही आयफोन विकत घेण्याचा विचार करत आहात का ? तर तुम्ही कदाचित हा विचार करत असाल की आता डिव्हाइस खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? कारण Apple ने १२ सप्टेंबर रोजी आपला Wonderlust इव्हेंट आयोजित केला आहे. या इव्हेंटमध्ये आयफोन १५ सिरीजसह अनेक प्रॉडक्ट्स लॉन्च होणार आहेत. मात्र तज्ज्ञांनी पहिल्यांदाच आयफोन खरेदीदारांना आयफोन खरेदी न करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीचा हा इव्हेंट क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात होणार असल्याची पुष्टी कंपनीने केली आहे.

आयफोन खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे का?

सध्या काही खरेदीदार विशेषतः पहिल्यांदाच आयफोन १५ खरेदी करण्याचा विचार करत आहेत. मात्र लॉन्च होणारे नवीन मॉडेल खरेदी करावे की सध्या उपलब्ध असलेल्या मॉडेलपैकी एक खरेदी करावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. खरेतर स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी अनेक गोष्टींचा विचार करणे महत्वाचे आहे. आयफोन १५ सिरीज लवकरच लॉन्च होणार आहे. तसेच त्याची लॉन्चिंगची तारीख देखील सणासुदीच्या काळात असणार आहे. आता एखादे डिव्हाइस खरेदी करण्याची घाई केल्यास तुम्ही काही महत्वाची फीचर्स आणि सणासुदीच्या काळात मिळणाऱ्या ऑफर्स गमवू शकता. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
israel hamas agree to ceasefire conflict in gaza to end after 15 months
इस्रायल-हमास युद्धविरामास सहमती; १५ महिन्यांनंतर गाझामधील संघर्ष थांबणार
Image Of Adani Power
Adani Power चे शेअर्स दोन दिवसांत २७ टक्क्यांनी कशामुळे वाढले? कंपनीने सांगितले कारण
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
Most consumers eye EVs as next car charging gaps remain key concern: TCS study
इलेक्ट्रिक वाहनांबाबत ‘टीसीएस’ची महत्त्वपूर्ण भविष्यवाणी
adani group stocks gains
Adani Group Shares: काल शेअर बाजार कोसळल्यानंतर आज अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी; कारण काय?
Image of an iPhone with a USB-C port or a related graphic
iPhone युजर्सची चिंता वाढवणारी बातमी! यूएसबी-सी पोर्टद्वारे हॅक होऊ शकतात फोन, सुरक्षा संशोधकाचा दावा

हेही वाचा : Apple Event 2023: iPhone 15 सिरीजच्या लॉन्चिंगची तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार स्पेशल इव्हेंट

कोणत्याही सिरीजमधील आयफोन खरेदी करण्याआधी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. विशेषतः जर का तुम्ही क्रेडिटवर आयफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात. खरेतर यामधील अनेक गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या असतात. जसे की वाढत असलेले भाडे, वाढती महागाई आणि नोकरीमधील स्थिरता तसेच आर्थिक परिस्थिती अशा गोष्टींचा विचार करावा लागतो. तथापि या गोष्टींमधील काही मुद्द्यांचा आयफोनशी कोणताही संबंध येत नाही.

तुम्हाला आयफोन कशासाठी हवा आहे?

आयफोन खरेदी केल्यांनतर तुमच्या आयुष्यात कोणते बदल होणार आहेत हा प्रश्न तुम्ही स्वतःला आयफोनची खरेदी करण्यापूर्वी विचारला पाहिजे. अनेक लोकं सॉफ्टवेअर आणि Apple च्या इकोसिस्टिमकडे पाहून आयफोन खरेदी करण्यासाठी आकर्षित होतात. तर अनेक जण केवळ आपले स्टेट्स आपली प्रोफाइल चांगली वाटावी म्हणून आयफोनची खरेदी करतात. यामध्ये असे देखील काही खरेदीदार आहेत जे अनेक वर्षे अँड्रॉइड स्मार्टफोनचा वापर करत आहेत आणि बदल म्हणून किंवा वैयक्तिक कारणांमुळे ते आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असतात. तुमच्या आयुष्यातील पुढील ध्येयाचा विचार करावा. आयफोनची खरेदी करणे तुमच्या प्लॅनमध्ये कसे बसते? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आयफोन खरेदी करण्यामागचे उद्दिष्ट ठरवण्यास मदत करू शकते.

तुम्ही आर्थिकदृष्ट्या तयार आहात का ?

आयफोन खरेदी करणे ही एक महागडी खरेदी असणार आहे. तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण करून आताच नोकरीला किंवा व्यवसायाला सुरुवात केली आहे. तसेच तुम्ही पहिल्यांदाच आयफोन खरेदी करणार आहात असे गृहीत धरून चालले तर पहिल्यांदा टीमच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेणे महत्वाचे ठरते. बायबॅक स्कीम, EMI पर्यायांमुळे भारतात आयफोनची खरेदी करणे सोपे झाले आहे. मात्र तरीही तुम्हाला तुमचे आर्थिक मूल्याकंन करणे आवश्यक आहे.

हेही वाचा : iPhone 15 ची लॉन्चिंगची तारीख आली समोर, सप्टेंबर महिन्यात ‘या’ दिवसापासून उपलब्ध होणार

आयफोन खरेदी करताना तुम्ही जर का EMI वर घेणार असाल तर तुम्हाला थोडीशी रक्कम डाऊन पेमेंट म्हणून भरावी लागते. तुम्ही डाउनपेमेंटसाठी किती पैसे साठवले आहेत यावरून तुम्ही तुमच्याआर्थिक तयार देखील ठरवू शकता. तुम्ही केलेलं डाऊन पेमेंट हे केवळ आयफोनसाठी भरावी लागणारी रक्कम नाहीये तर तुम्हाला तातडीने कोणती दुरुस्ती करायची असेल तसेच pple म्युझिक आणि क्लाउड यांसारख्या सेवांसाठी देखील रक्कम साठवण्याची आवश्यकता असते.

तुमचे बजेट काय आहे?

तसेच तुमचे आयफोन खरेदी करण्याचे बजेट काय आहे यावर तुम्हाला कोणते मॉडेल खरेदी करणे शक्य होणार आहे याचा विचार केला पाहजे. कंपनी बाजारपेठेत अनेक आयफोनचे मॉडेल्स ऑफर करते. उदाहरणार्थ आयफोन १४ प्लस हा आयफोन १४ प्रो मॅक्सला फॉलो करतो. ज्यात ६.७ इंचाचा डिस्प्ले आणि आयफोन १४ किंवा १४ प्रो मॉडेलच्या तुलनेत मोठी बॅटरी मिळते.

तुम्ही आयफोन आताचं का खरेदी केला पाहिजे ?

आयफोन १५ सिरीजमधील मॉडेल्सची किंमत त्याच्या आधीच्या लाइनअपपेक्षा जास्त असल्याचे म्हटले जात आहे. आयफोन १५ प्रो ची किंमत आयफोन १४ प्रो पेक्षा $१०० (सुमारे ८,५०० रुपये) जास्त सु शकते. तर आयफोन १५ प्रो मॅक्स मॉडेलची किंमत $१०० (सुमारे ८,५०० रुपये) ते $२०० (सुमारे १७,००० रुपये) जास्त असू शकते. खरेतर आयफोन १५ प्रो च्या किंमती अमेरिकेच्या बाहेर जास्त असू शकतात. विशेषतः भारतात असलेल्या स्थानिक टॅक्समुळे आयफोनची किंमत जास्त आहे. जर का तुम्हाला वाटत असेल की सध्या तुमच्याकडे असलेल्या आयफोनसह तुम्ही किमान तीन वर्षे काढू शकता. तर तुम्ही नवीन आयफोन खरेदी करणे टाळावे. जर का तुम्हाला आयफोनमध्ये बॅटरी किंवा सॉफ्टवेअरची समस्या येत असल्या अशा परिस्थितीमध्ये आताच वरील सर्व गोष्टींचा विचार करून नवीन आयफोन खरेदी करावा.

Story img Loader