लॅपटॉप वैयक्तिक आणि ऑफिसच्या कामासाठी सोईस्कर ठरतो. त्यामध्ये घरबसल्या ऑनलाइन मीटिंग, व्हिडीओ कॉल, क्लास अटेंड करणे सोपे जाते. तसेच आजच्या घडीला तंत्रज्ञान जसे झपाटय़ाने बदलत जात आहे त्याप्रमाणे आता एआयची उपकरणेसुद्धा बाजारात उपलब्ध होऊ लागली आहेत. जर तुम्हीही एआय तंत्रज्ञानाने विकसित मस्त लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.

असुस इंडियाने (ASUS India) काल भारतात झेनबुक एस१३ ओएलईडी (Zenbook S 13 OLED) (UX5304MA) आणि विवोबुक १५ (Vivobook 15) (X1504VAP) मॉडेल लॉंच करण्याची घोषणा केली आहे. असूसने ॲब्सोल्युट परफॉर्मन्स आणि स्टाईलसह नेक्स्ट जनरेशन लॅपटॉप लाँच केले आहेत. ग्राहकांसाठी स्लिम आणि लाइट झेनबुक एस१३ मध्ये OLED डिस्प्ले; तर विवोबुक १५ हा एक नवीन अवतार आहे; ज्यात मॉडर्न रीडिझाइन आहे.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Aishwarya avinash narkar in front of old father reaction viral
Video: नारकर जोडप्याचा दाक्षिणात्य गाण्यावर डान्स, लेक अन् जावयाला पाहून ऐश्वर्या यांचे वडील झाले खूश, सर्वत्र होतंय कौतुक
New Maruti Suzuki Dzire earns 5-star rating in Global NCAP safety test Delivers 25.71 Kmpl 2024 Maruti Dzire features and engine
New Maruti Suzuki Dzire: मारुतीने केली सगळ्यांची बोलती बंद! लॉंच होण्यापूर्वीच डिझायरला मिळालं ५-स्टार ग्लोबल NCAP रेटिंग
Dog Viral Video
श्वानाला झोप अनावर झाल्यानं बसल्या जागी केलं असं काही… VIDEO पाहून पोट धरून हसाल
Viral video of a man carries a snake to the hospital after it bites him
सापाने दंश केला तरी जगण्याची इच्छा सोडली नाही, रुग्णालयात सापाला घेऊन आला अन्…, VIDEO पाहून माणसाच्या हिमतीला कराल सलाम

लाँचच्या वेळी ASUS इंडियाचे उपाध्यक्ष, ग्राहक व गेमिंग पीसी सिस्टीम बिझनेस ग्रुपचे अरनॉल्ड म्हणाले, “असुस सुरुवातीपासूनच नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान जगासमोर आणण्यावर ठामपणे विश्वास ठेवत आहेत; जे सध्याच्या वापरकर्त्यांसाठी फायदेशीर आहे. ASUS च्या लाइनअपमधील दोन्ही नवीन लॅपटॉप ग्राहकांसाठी त्यांच्या ग्राहक उत्पादनांची श्रेणी आणखी उंचावर नेण्यावर लक्ष केंद्रित करीत आहेत.

असुस झेनबुक एस१३ ओएलईडी

या लॅपटॉपमध्ये १३.३ इंच २.२के रेझोल्युशन, ६०० नीट्स पीक ब्राइटनेस, ८५ टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो, १०० टक्के डीसीआय-पी ३, डॉल्बी व्हिजन, डिस्प्लेएचडीआर ६०० ट्रू ब्लॅक यांसारखी अनेक खास फीचर्स आहेत. हा लॅपटॉप Intel Core Ultra 7 155U वर चालतो. त्यामध्ये ग्राफिक्ससाठी इंटेल Xe इंटिग्रेटेड ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे. हा लॅपटॉप विंडोज ११ होमवर चालतो. या लॅपटॉपमध्ये 63Wh लिथियम-पॉलिमर बॅटरी आणि 65W टाईप-सी पॉवर ॲडॉप्टर आहे. ऑडिओ सिस्टीमसाठी यात दोन स्पीकर्स, हरमन कार्डन प्रमाणित, डॉल्बी ॲटमॉस साउंड सिस्टीम, इनबिल्ड ॲरे मायक्रोफोन आहे. हा लॅपटॉप Asus Argosense टचपॅडसह येतो. त्यात दोन थंडरबोल्ट, चार यूएसबी, एचडीएमआय २.१ आणि यूएसबी ३.२ जेन २ टाईप ए (USB 3.2 Gen 2 Type-A) चार्जिंगसह कॉम्बो ऑडिओ जॅक आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या लॅपटॉपमध्ये ड्युअल-बॅण्ड वाय-फाय 6E, ब्ल्यूटूथ 5.2 सपोर्ट आहे. तसेच या Asus लॅपटॉपचे वजन एक किलोग्रॅम आहे.

स्टोरेज : लॅपटॉपमध्ये ३२जीबी पर्यंत 7467 MHz LPDDR5X रॅम प्रदान केली गेली आहे. त्यात १टीबी 1TB PCIe 4.0 x4 NVMe M.2 एसएसडी स्टोरेज आहे.

कॅमेरा : असुसमध्ये असणारा AiSense कॅमेरा FHD IR कॅमेरा 3DNR तंत्रज्ञान, सभोवतालचा प्रकाश आणि रंग सेन्सर्ससह येतो.

असुस विवोबुक १५ फीचर्स

असुस लॅपटॉपचे वजन १.७ किलो आहे. लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये १५.६ इंच एफएचडी रिझोल्युशन, २५० नीटस पीक ब्राइटनेस, ६०एचझेड रिफ्रेश रेट, आयपीएस पॅनेल यांसारखी अनेक खास फीचर्स आहेत. तसेच हा लॅपटॉप विंडोज ११ होमवर Intel Core Ultra 5 120U आणि Intel Core 3 100U वर चालतो. त्यामध्ये ग्राफिक्ससाठी इंटेल इंटिग्रेटेड ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे.

स्टोरेज : यात ८जीबी ३२०० एमएचझेड DDR4 RAM ऑनबोर्ड आहे; जे १ एक्स एससो DIMM स्लॉट १६जीबी ३२०० एमएचझेड DDR4 ला सपोर्ट करतो. त्यात 1TB PCIe 4.0 NVMe आणि M.2 SSD स्टोरेज देण्यात आले आहे.

कॅमेरा : यात फिजिकल शटर आणि 3DNR तंत्रज्ञानासह HD वेबकॅम आहे. या लॅपटॉपमध्ये 42Wh लिथियम-पॉलिमर बॅटरी आणि 45W टाइप-सी पॉवर ॲडॉप्टर आहे. ऑडिओ सिस्टीमसाठी यात सोनिकमास्टर, बिल्ट-इन स्पीकर व बिल्ट-इन ॲरे मायक्रोफोन देण्यात आला आहे. त्यात प्रेसिजन टचपॅड (पीटीपी) तंत्रज्ञान आहे. यात एक यूएसबी ३.२ जनरेशन, दोन टाइप-सी, दोन यूएसबी ३.२ जनरेशन १ टाइप-ए, एक यूएसबी २.० टाइप-ए, एक पूर्ण आकाराचा एचडीएमआय १.४, एक ३.५ मिमी ऑडिओ कॉम्बो जॅक आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या लॅपटॉपमध्ये वाय-फाय ६, ब्ल्यूटूथ ५.२ सपोर्ट आहे.

हेही वाचा…७० टक्के वीज बचत करून खर्च वाचवते ‘ही’ AI वॉशिंग मशीन; कपडे धुण्याचा वेळही होईल अर्धा, पाहा फीचर्स व किंमत

झेनबुक १३ व विवोबुक १५ च्या किंमती :

असुस झेनबुक १३ लॅपटॉप चार प्रकारांमध्ये लाँच करण्यात आला आहे आणि त्याची किंमत १,२९,९९० रुपयांपासून सुरू होते. त्याशिवाय विवोबुक १५ची किंमत ४९,९९० रुपयांपासून सुरू होते आणि हा लॅपटॉपदेखील चार प्रकारांमध्ये लॉंच करण्यात आला आहे. असुस एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट ,असुस ई-शॉपवर हे दोन्ही लॅपटॉप आणि त्याचे व्हेरिएंट तुम्हाला खरेदी करता येतील.

झेनबुक १३ व विवोबुक १५ व्हेरिएंटच्या किंमती पाहू…

१. झेनबुक एस १३ ओएलईडी UX5304MA-NQ751WS १,२९,९९० रुपयांना उपलब्ध आहे.

२. झेनबुक एस १३ ओएलईडी UX5304MA-NQ752WS १,३१,९९० रुपयांना उपलब्ध आहे.

३. झेनबुक एस १३ ओएलईडी UX5304MA-NQ761WS १,३९,९९० रुपयांना उपलब्ध आहे.

४. झेनबुक एस १३ ओएलईडी UX5304MA-NQ762WS १,४१,९९० रुपयांना उपलब्ध आहे.

५. विवोबुक १५ X1504VAP-NJ321WS ४९,९९० रुपयांना उपलब्ध आहे.

६. विवोबुक १५ X1504VAP-NJ322WS ४९,९९० रुपयांना उपलब्ध आहे.

७. विवोबुक १५ X1504VAP-NJ541WS ६७,९९० रुपयांना उपलब्ध आहे.

८. विवोबुक १५ X1504VAP-NJ542WS ६७,९९० रुपयांना उपलब्ध आहे.

झेनबुक एस १३ ओएलईडी आणि विवोबुक १५ हे १३ मार्च २०२४ रोजी पासून सुरुवातीच्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.