क्रोमबुक लॅपटॉप वैयक्तिक आणि ऑफिसच्या कामासाठी सोईस्कर ठरतो. त्यामध्ये घरी बसल्या ऑनलाइन मीटिंग, व्हिडीओ कॉल, क्लास अटेंड करणे सोपे जाते. जर तुम्हीही स्वस्तात मस्त लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. असूस कंपनीने त्यांचा पहिला मीडिया टेक Kompanio 520 प्रोसेसर पॉवर्ड क्रोमबुक सीएम१४ (CM14) लॅपटॉप लाँच केला आहे; ज्याची किंमत २६,९९० रुपये आहे. १४ इंचांचा १०८०पी डिस्प्ले असणारा कॉम्पॅक्ट क्रोमबुक लॅपटॉप असणार आहे; जो ChromeOS द्वारे समर्थित आहे. तसेच ग्राहकांसाठी आजपासून हा लॅपटॉप ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तर या बातमीत आपण क्रोमबुक लॅपटॉपचे फीचर्स पाहणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

असूस क्रोमबुक सीएम१४ ८जीबी रॅम, १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज आणि मीडिया टेक Kompanio 520 द्वारे समर्थित आहे. त्यामुळे हे क्रोमबुक मॉडेल इतरांच्या तुलनेत दुप्पट स्टोरेज प्रदान करेल; जे ४जीबी रॅम आणि ६४जीबी स्टोरेज असे दोन पर्याय ऑफर करतात. तसेच या क्रोमबुकमध्ये ग्राहकांना एक मायक्रो एसडी कार्ड आणि १२ महिन्यांसाठी १०० जीबी क्लाउड स्टोरेजसह ‘गूगल वन’चे सबस्क्रिप्शन देण्यात येईल.

मीडिया टेकद्वारे हा क्रोमबुक Kompanio 520 हा आर्म माली जी५२ एमसी२ 2EE GPU, ऑक्टा-कोर सीपीयू क्लस्टरसह (Arm Mali G52 MC2 2EE GPU) खास डिझाइन केलेला प्रोसेसर आहे. त्यामध्ये प्रोसेसर वाय-फाय ६ आणि ब्ल्यूटूथ ५.३ सारखे नवीन वायरलेस तंत्रज्ञानदेखील उपलब्ध आहे. क्रोमबुक सीएम १४ला बॅटरी लाइफसाठी एक खास फीचर दिले आहे. म्हणजेच १५ तासांपर्यंत या क्रोमबुकचे बॅटरी लाइफ असणार आहे. 42 Wh ची बॅटरी या लॅपटॉपला पॉवर देते आणि यूएसबी सी पोर्टद्वारे 45W जलद चार्जिंग होण्यास मदत करते. क्रोमबुकचे सॉफ्टवेअर ॲण्ड्रॉइड ॲप्सच्या लेटेस्ट व्हर्जनला सपोर्ट करते. तसेच हे क्रोमबुक मिल एसटीडी ८१० एच यूएस मिलिटरी ग्रेड Durability ने प्रमाणितसुद्धा आहे.

हेही वाचा…Google Collection: आता गूगलवरही फोटो, व्हिडीओसह ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी सेव्ह करता येणार; फक्त ‘या’ स्टेप्स फॉलो करा

फीचर्स :

असूस क्रोमबुक सीएम१४ वर 720p वेब कॅमेरा, प्रायव्हसीसाठी फिजिकल शटर आणि फेस ऑटो-एक्सपोजरसारख्या फीचर्सचा समावेश आहे. जे वातावरणानुसार ब्राइटनेस कमी-जास्त करून, फोटो किंवा ऑडिओ गुणवत्ता सेट करतात. तसेच या क्रोमबुकमध्ये दुहेरी Array मायक्रोफोन आहे; ज्याने ऑडिओ गुणवत्ता आणखीन सुधारण्यास मदत होते. नवनवीन फीचर्ससह तुम्ही असूसचा हा क्रोमबुक लॅपटॉप तुम्ही ॲमेझॉनवर खरेदी करू शकणार आहात.