आसूसने मंगळवारी आसूस आरओजी फोन ६ (Asus ROG Phone 6) आणि आरओजी फोन ६ प्रो (ROG Phone 6 Pro) स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. हे दोन्ही गेमिंग स्मार्टफोन क्वालकॉमच्या फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन ८+ जेन १ एसओसीद्वारे समर्थित आहेत. या स्मार्टफोन्समध्ये १८ जीबीपर्यंत रॅम मिळेल. आसूस आरओजी फोन ६ आणि आसूस आरओजी फोन ६ प्रो मध्ये ६.७८ इंचाचा फुलएचडी+ सॅमसंग एमओएलईडी डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट १६५Hz, एचडीआर१०+ सपोर्ट आणि आरओजीचे खास ट्यूनिंग तंत्रज्ञान आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये ६००० एमएएच बॅटरी आणि ५० मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आसूस आरओजी फोन ६ ची किंमत

आसूस आरओजी फोन ६ च्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत ७१,९९९ रुपये आहे तर आसूस आरओजी फोन ६ प्रो च्या १८ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८९,९९९ रुपये आहे. तथापि, कंपनी नंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे विक्री आणि उपलब्धतेची घोषणा करेल. आसूस आरओजी फोन ६, फँटम ब्लॅक आणि स्टॉर्म व्हाईट या दोन कलर पर्यायांमध्ये आणि आसूस आरओजी फोन ६ प्रो स्टॉर्म व्हाइट कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.

मोबाईल चोरीला गेल्यावर बँक डिटेल्स आणि मोबाईल वॉलेटचे संरक्षण कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती

आसूस आरओजी फोन ६ मधील स्पेसिफिकेशन

आसूस आरओजी फोन ६ आणि आसूस आरओजी फोन ६ प्रो क्वालकॉमच्या नवीनतम स्नॅपड्रॅगन ८+ जेन १ एसओसीने सुसज्ज आहेत, जे अ‍ॅड्रेनो ७३० जीपीयूसह जोडलेले आहे. आसूस आरओजी फोन ६ १२ जीबी ते १८ जीबी एलपीडीडीआर५ रॅमसह येतो. आसूसने दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये गेम कुल ६ कूलिंग सिस्टम दिली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की आरओजी फोन मालिका सादर केल्यापासून हे कूलिंगचे सर्वात मोठे अपडेट आहे. हे १० अंश सेल्सिअस पर्यंत कार्यप्रदर्शन सुधारते असा आसूसचा दावा आहे.

आसूस आरओजी फोन ६ चा कॅमेरा

आरओजी फोन ६ आणि आरओजी फोन ६ प्रो मध्ये ५० मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक सेन्सर ५० मेगापिक्सेल सोनी आयएमएक्स ७६६ सह येतो. यात १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देखील आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

वेबसाइट खरी आहे की बनावट हे ओळखणे झाले सोपे; मिनिटांमध्ये कळणार सत्यता

आसूस आरओजी फोन ६ ची बॅटरी

आसूस आरओजी फोन ६ आणि आसूस आरओजी फोन ६ प्रो ला ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएच बॅटरी मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी, या स्मार्टफोनमध्ये ५जी, ४जी एलटीई, वायफाय ६, वायफाय डायरेक्ट, ब्लूटूथ व्ही५.२, एनएफसी आणि दोन यूएसबी टाइप-सी पोर्ट आहेत. ऑनबोर्ड सेन्सर्समध्ये जीएनएसएस जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, बायडू (Beidou), क्यूझेडएसएस (QZSS), नावी-सी (NaviC), एक्सेलेरोमीटर, ई-कंपास, प्रॉक्सिमिटी सेन्सर, अ‍ॅम्बियंट लाइट सेन्सर, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, जायरोस्कोप आणि एअर ट्रिगर ग्र्रिगर ६ आणि अल्ट्रासोनिक सेन्सरचा समावेश आहे. हे स्मार्टफोन दोन ५-चुंबक १२x१६ सुपर लिनियर स्पीकरसह येतात जे डीअरॅकद्वारे ट्यून केलेले आहेत. दोन्ही फोन आयपीX४ रेट केलेले आहेत. स्मार्टफोनचे वजन २३९ ग्रॅम आहे.