Mumbai-Navi Mumbai Atal Setu Bridge: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL ) म्हणजेच अटल सेतू या प्रकल्पाचे काल १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते उदघाटन झालं आहे. सागरी सेतू जगातील सर्वात लांब पुलांपैकी एक आहे. अटल सेतू मुंबईतील शिवडी येथून सुरू होऊन नवी मुंबईतील चिर्ले येथे संपणार आहे. मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांतील अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीएने हा प्रकल्प साकारला आहे. या पुलासाठी भूकंप प्रतिरोधक, सागरी जीव संरक्षण आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

तर अटल सेतूमध्ये कोणत्या सात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ते पाहू.

77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Tire killer is going to be tested in three important areas of Thane railway station area
स्थानक परिसरात लवकरच ‘टायर किलर’
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
traffic jam at Khandala Ghat , traffic jam Mumbai Pune Expressway,
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी; दहा ते बारा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा
46 unauthorized water connections disconnected in Ulhasnagar news
उल्हासनगरमध्ये ४६ अनधिकृत नळ जोडण्या तोडल्या; पुन्हा अनधिकृत जोडणी केल्या गुन्हेही दाखल होणार, पालिकेचा इशारा

१. भूकंप-प्रतिरोधक डिझाइन (Earthquake-Resistant Design) : मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमध्ये भूकंप-प्रतिरोधक तंत्रज्ञानाचा समावेश आहे. अटल सेतू ६.५ रिश्टर स्केलच्या तीव्रतेसह विविध प्रकारचे भूकंप सहन करू शकतो.

२. ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक (Orthotropic Steel Deck) : ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक अत्यंत मजबूत असतात आणि वाहनांचा भार वाहण्याची त्यांची क्षमता इतर डेकपेक्षा अधिक असते. हे तंत्रज्ञान परदेशात काही ठराविक देशातच वापरले जाते. तसेच भारतात पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा अटल सेतूमध्ये वापर करण्यात आला आहे.

३. रिव्हर्स सर्कुलेशन रिंग्स (Reverse Circulation Rigs) : आवाज आणि कंपन नियंत्रणात ठेवण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. अटल सेतूच्या परिसरातील सागरी जीवांचे संरक्षण करण्यासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

४. ध्वनी प्रदूषण (Noise Reduction Measures) : ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी अटल सेतूमध्ये ध्वनी सायलेन्सर आणि ध्वनी Barriers समाविष्ट आहेत.

हेही वाचा…CES 2024: सर्वात मोठ्या टेक इव्हेंटमध्ये गुगलने चार फीचर्स केले लॉन्च; Android डिव्हाइसमध्ये असे करेल काम…

५. इको-फ्रेंडली लाइटिंग ( Eco-Friendly Lighting) : अटल सेतूवर लावण्यात आलेली लाइटिंग पर्यावरणाला आणि सागरी वातावरणाला इजा पोहचणार नाही, या दृष्टीने डिझाइन करण्यात आली आहे.

६. टोलसाठी रांगा नाहीत (No toll queues) : अटल सेतूवर ओपन रोड टोल सिस्टम असणार आहे. वाहन स्कॅन करून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल भरता येणार आहे. यामुळे टोलनाक्यावर लांब रांग लावण्याची गरज भासणार नाही.

७. डिस्प्ले (Displays) : चालकांना रिअल-टाइमची माहिती देण्यासाठी पुलावर ठराविक अंतराने डिस्प्लेदेखील लावण्यात आले आहेत. यामुळे मार्गावरील वाहतूक कोंडी किंवा अपघातांबद्दल सूचित केले जाईल; तर या सात तंत्रज्ञानाचा वापर अटल सेतूमध्ये करण्यात आला आहे.

Story img Loader