सध्याचा जमाना हा डिजीटल आहे, त्यामुळे प्रत्येकाला त्यांची दैनंदिन कामे करण्यासाठी इंटरनेटची गरज भासतेच. जशी आपणाला इंटरनेटची गरज आहे कदाचित त्याहीपेक्षा जास्त ती सेवा पुरविणाऱ्या कंपन्याना ग्राहकांची आवश्यकता असते.
कारण सध्या इंटरनेटची सेवा पुरवणाऱ्या अनेक टेलीकॉम कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठीची मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरु आहेत. त्यामुळे ग्राहक हा आपली इंटरनेट सेवा कशी स्वीकारेल यासाठी कंपन्यांकडून वेगवेगळे प्लॅन दिले जातात. यामध्ये कमी किमतीमध्ये जास्त नेटपॅक किंवा इतर कंपन्याच्या तुलनेत जास्त स्पीड देण्याचा प्रयत्न या कंपन्यांकडून केला जातो.
मात्र, अनेक वेळा कंपन्याकडून केवळ खोट्या घोषणा केल्या जातात आणि प्रत्येक्षात मात्र, तेवढं नेटचं स्पीड ग्राहकांना मिळत नाही. त्यामुळे वापरकर्त्तयांना त्याचा चांगलाच पश्याताप होतो. पण नेटकऱ्यांना खोटे आश्वासन देणाऱ्या, टेलस्ट्रा, टीपीजी आणि ऑप्टस या तीन टेलीकॉम कंपन्यांना आता कोट्यावधींचा फटका बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या तीनही कंपन्या ऑस्ट्रेलियामधील असून त्यांनी इंटरनेट प्लॅनबद्दल चुकीची माहिती दिल्याने त्यांना १७८ कोटी रुपयांचा दंड ठोटावला आहे. ऑस्ट्रेलियाच्या फेडरल कोर्टाने टेलस्ट्रा कंपनीला १५ मिलियन डॉलर, टीपीजी टेलिकॉमच्या एका युनिटला ५ मिलियन तर ऑप्टस ला १३.५ मिलियन डॉलर्सचा दंड ठोटावला आहे. याबाबतची माहिती ऑस्ट्रेलियन स्पर्धा आणि ग्राहक आयोग(ACCC)कडून देण्यात आली आहे.
एसीसीसीच्या म्हणण्यानुसार, या तिनही कंपन्यांनी २०१९ मध्ये किमान १२ महिन्यांसाठी खोटी किंवा आणि दिशाभूल करणारी आश्वासने दिली होती. या कंपन्यांनी केलेला दावा हा ५० मेगाबिट प्रति सेकंद (Mbps) किंवा १०० Mbps फायबर ते नोड योजनांशी संबंधित होता. शिवाय या सर्व टेलीकॉम ऑपरेटरनी कोर्टामध्ये चुकीची माहिती दिल्याबाबतचा आरोप मान्य केला आहे. त्यांच्या या खोट्या माहितीमुळे १ लाख २० हजार ग्राहक या कंपन्यांकडे आकर्षित झाले होते. तर टेलस्ट्रा’ने त्यांच्या एका अहवालामध्ये सांगितलं आहे की, “२०१९ ते एप्रिल २०२० च्या मध्ये ४८ हजार ग्राहकांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना जास्त स्पीड देण्यात आम्ही अपयशी ठरलो.”
दरम्यान, रॉरटर्सने दिलेल्या माहितीनुसार, टीपीजी (TPG) आणि ऑप्टस (Optus) टेलिकॉमने आपली सिस्टीम बदलल्याचा दावा केला आहे. तर टेलस्ट्रा देखील गाईडलाईन पुर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असून ते आपल्या ग्राहकांना रिफंड देणार असल्याचंही बोललं जात आहे.