Avoid this things when phone fall in water : स्मार्टफोन हा सर्वांच्या गाळ्यातील ताईत झाला आहे. त्याच्याशिवाय कुणालाच कर्मत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. उठताना बसताना तो लोकांच्या सोबत असतो. वापरताना कधी कधी खिशातून किंवा हातातून पडतो देखील. यामुळे स्क्रीनला किंवा बॉडिला नकुसान होते जे दुरुस्त करता येते. मात्र, फोन पाण्यात पडला तर? मग मात्र तो दुरुस्त होईल की नाही हे सांगता येत नाही. परंतु, असे तुमच्यासोबत झालेच तर काही गोष्टी अजिबात करू नका. यामुळे तुमच्या फोनला नुकसान होऊ शकते. फोन भिजल्यानंतर कोणत्या गोष्टी करून नये? याबाबत आपण जाणून घेऊया.
१) सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व माहिती द्या
स्मार्टफोन पाण्यात बुडाल्यास त्यावरील वॉरंटी संपते, त्यामुळे लोक बरेचदा फोन पाण्यात पडल्याचे सर्व्हिस सेंटरमध्ये लपवतात. मात्र, सर्व्हिस सेंटरमधील कर्चाऱ्यांना काय झाले हे कळून जाते. मात्र, तुमचा फोन पूर्णत: बुडाला नसेल तर कंपनीकडून तुम्हाला त्याची वॉरंटी मिळू शकते.
(दरीत 300 फूट खोल अंतरावर कोसळली कार, ‘Apple iphone’ने २ व्यक्तींचे असे वाचवले प्राण)
२) हेअर ड्रायरचा वापर टाळा
फोन पाण्यात भिजल्यानंतर त्यावर हेअर ड्रायरचा वापर करू नका. हेअर ड्रायरमधून निघणारी हवा ही खूप गरम असते जी फोनच्या नाजूक इलेक्ट्रोनिक्स भागांना नुकसान करू शकते. म्हणून फोन भिजल्यास त्यावर हेअर ड्रायरच्या हवेचा मारा करू नका.
३) चार्जिंग टाळा
फोन पाण्यात पडल्यानंतर तो सुरू होत नसेल तर चार्जिंग करू नका. कारण पाण्यात बुडाल्याने फोनचे भाग भिजलेले असतात. अशात चार्जिंग केल्याने शॉर्ट सर्किट होऊ शकतो. याने फोनला मोठे नुकसान होऊ शकते. म्हणून फोन पाण्यात पडल्यानंतर त्याला चार्ज करण्याचे टाळा.
(ग्राहकांची होणार मोठी बचत, वस्तूंची किंमत कमी होताच मिळणार माहिती, जाणून घ्या कसे?)
४) पाण्यात भिजलेला फोन सुरू करू नका
फोन पाण्यात पडल्यानंतर देखील सुरू असेल तर त्यास आधी बंद करा. कारण भिजलेला फोन सुरू असल्यास त्याचा वापर केल्याने त्याला नुकसान होऊ शकते.