Ayodhya Ram Mandir Free Prasad Online Booking: येत्या २२ जानेवारीला नव्याने बांधलेल्या मंदिरात रामललाचा अभिषेक केला जाणार आहे. त्यानिमित्तानं देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. यासंदर्भातील सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मंदिराकडे जाणारा रस्ता आणि येथील चौकाचौकात अतिशय आकर्षक सजावट करण्यात आली आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर तमाम रामभक्तांचे स्वप्न पूर्ण होणार असून, त्यासाठीची तयारी जोरात सुरू आहे. सरकारने या दिवशी सर्वसामान्यांना अयोध्येत न येण्याचे आवाहन केले असून, आपापल्या परिसरामध्ये कार्यक्रम आयोजित करून दिवाळी साजरी करण्याचं आवाहनं केलं आहे. अशा परिस्थितीत एका खासगी कंपनीने राम मंदिराचा प्रसाद घरोघरी वाटण्याची योजना आणली आहे.

खादी ऑर्गेनिक नावाच्या एका कंपनीने दावा केला आहे की, ते राम मंदिरातील प्रसाद प्रत्येक घरापर्यंत पोहोचवेल. पण यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागणार आहे. खादी ऑर्गेनिकचे विक्री प्रमुखांनी सांगितले की, राम मंदिराचा प्रसाद वाटप करणारी खादी ऑर्गेनिक वेबसाइट ड्रिलमॅप्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा एक भाग आहे. ही कंपनी भारतात बनवलेल्या सेंद्रिय वस्तू अमेरिका आणि कॅनडात विकते, ज्याचे कार्यालय नोएडामध्ये आहे. खादी ऑर्गेनिक कंपनीचे संस्थापक आशिष सिंह हे सध्या फेसबुकच्या मूळ कंपनी मेटामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत आहेत.

amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Bhool Bhulaiyaa 3 Vs Singham Again Collection
‘सिंघम अगेन’च्या दमदार स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी! ‘भुलै भुलैया ३’ने नवव्या दिवशी कमावले तब्बल…
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”

या कंपनीचे मालक आशिष सिंह यांना काही दिवसांपूर्वी स्वप्नात श्री हनुमान यांनी दर्शन दिले होते. हनुमानानेच त्यांना हा प्रसाद वाटण्यास सांगितलं, असं त्यांनी सांगितले. यानंतर आशिष यांनी देशभरातील लोकांना मोफत प्रसाद वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि मोहीम सुरू केली असल्याचे, समोर आले आहे. कंपनीचे लोकं सर्व प्रसाद घेऊन मंदिरात जाणार आहेत. त्याठिकाणी विधिवत पूजा पार पाडल्यानंतर देशभरातील लोकांना हा प्रसाद पाठवण्यात येईल, यासाठी डिलिव्हरी पार्टनर्सची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

(हे ही वाचा : Ayodhya Ram Mandir: अयोध्येच्या संरक्षणासाठी AI सज्ज! श्रीरामाच्या मंदिर लोकार्पण सोहळ्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह असणार खास सुरक्षा)

कसं करावे ऑनलाईन बुकिंग?

  • सर्वात आधी khadiorganic.com या वेबसाइटला भेट द्या.
  • वेबसाईटच्या मुख्य स्क्रीनवर दिसणार्‍या मोफत प्रसाद पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.
  • तुम्हाला डोअरस्टेप डिलिव्हरी हवी असेल, तर डिलिव्हरी पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्हाला प्रसाद वाटप केंद्रावरुन हवं असेल तर पिकअप फ्रॉम डिस्ट्रिब्युशन सेंटर या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला तुमचा नाव पत्ता व इतर माहिती भरावं लागणार आहे.
  • नंतर होम डिलिव्हरीसाठी तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस भरावं लागेल.
  • तुम्हाला हे डिलिव्हरी चार्जेस द्यायचे नसतील तर तुमच्या शहरातील मोफत वितरण केंद्रावर क्लिक करा.
  • यामध्ये तुम्हाला सर्व केंद्रे माहीत असतील जिथे प्रसाद मोफत वाटला जाईल. पण तिथे जाऊन प्रसाद घ्यावा लागेल.

अयोध्या राम मंदिरातील प्रसाद तुम्हाला घरबसल्या अगदी मोफत मिळू शकतो. कंपनी मंदिरातील प्रसादाचे कोणतेही शुल्क आकारणार नाही. मात्र, तुम्हाला डिलिव्हरीसाठी शुल्क द्यावे लागणार आहे. यासाठी ५१ रुपये डिलिव्हरी चार्जेससाठी मोजावे लागणार आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. परंतु हा प्रसाद खरा आहे की खोटा, याची अद्यापही पुष्टी झालेली नाही.