आजकाल प्रत्येकाकडेच स्मार्टफोन आहे. अशातच या फोनची बॅटरी सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु जास्त वेळ फोन चार्ज करणे देखील हानिकारक आहे. आपला फोन चार्ज करण्यासंबंधी अनेक सल्ले दिले जातात. जर तुम्हाला देखील तुमच्या फोनमध्ये बॅटरी बॅकअप संबंधी समस्या जाणवत असतील तर तुम्ही या टिप्सचा वापर करू शकता. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी जास्त काळ टिकवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फोन गरम होऊ देऊ नये

स्मार्टफोनमध्ये लिथियम आयर्न बॅटरी असते. म्हणूनच फोन जास्त गरम होऊ देऊ नये. जास्त ऊन किंवा गरम तापमान असणाऱ्या ठिकाणी फोन ठेवू नये. कारण अशा वेळी तुमचा फोन घातक ठरू शकतो. गेम खेळताना तुम्ही तुमचा फोन चार्ज करणे देखील टाळावे, कारण यामुळे फोनचे तापमान वाढेल आणि बॅटरी खराब होईल.

चार्जिंग सुरु असताना फोनचा वापर करू नये

चार्जिंग सुरु असताना फोनचा वापर करणे टाळावे. याला परजीवी चार्जिंग म्हणतात आणि या प्रकारचा वापर हानिकारक असू शकतो. थोड्या प्रमाणात वापराचा भार बॅटरीला पूर्ण चार्ज होण्यापासून प्रतिबंधित करतो आणि बॅटरीचे नुकसान करतो.

बनावट चार्जरचा वापर करू नये

केवळ स्मार्टफोनच्याच कंपनीच्या चार्जरचा वापर करावा. बनावट चार्जरचा वापर करणे घातक ठरू शकते. उच्च-क्षमतेचे चार्जर ७० टक्के क्षमतेपर्यंत फोन पटकन चार्ज करू शकतात, परंतु या प्रक्रियेत ते फोनच्या बॅटरीचे नुकसान देखील करू शकतात.

पूर्ण चार्जिंग करू नये

असे म्हटले जाते की आपला फोन कधीही १००% चार्ज करू नये. फोन पूर्ण चार्जिंग पेक्षा एक-दोन टक्के कमी चार्ज करावा. जर असे केले नाही तर आपल्या फोनचा बॅटरी बॅकअप कमी होऊ शकतो. तसेच आपल्या फोनची बॅटरी २० टक्क्यांच्या खाली आल्यावर त्याला चार्ज करावे.

रात्रभर फोन चार्ज करू नये

रात्रभर फोन चार्ज केल्याने फोनच्या बॅटरीवर त्याचा वाईट परिणाम होतो. फोन जास्त वेळ चार्ज करणे टाळा. तुमचा फोन पूर्ण चार्ज झाल्यावर, तो ताबडतोब अनप्लग करा.