देशातील सुप्रसिद्ध टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या पोस्टपेड प्लॅनमध्ये सुधारणा केली आहे. एअरटेलने पोस्टपेड प्लॅनमध्ये उपलब्ध अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime )मेंबरशिपची वैधता १ वर्षावरून ६ महिन्यांपर्यंत कमी केली आहे. या बदलानंतर एअरटेल पोस्टपेड प्लॅन वापरणाऱ्या युजर्सना आता ६ महिन्यांसाठी अॅमेझॉन प्राइमचा अॅक्सेस मिळणार आहे. अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप ४९९ रुपये ,९९९ रुपये, १,१९९ रुपये आणि १,५९९ रुपयांच्या एअरटेल पोस्टपेड प्लॅनसह उपलब्ध आहे. एअरटेल त्‍याच्‍या काही ब्रॉडबँड प्‍लॅनसह अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप देखील ऑफर करते, त्‍याचे फायदे तसेच राहतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एअरटेल वेबसाइटवरील सूचीनुसार, एअरटेलचे ४९९ रुपये ,९९९ रुपये, १,१९९ रुपये आणि १,५९९ चे पोस्टपेड प्लॅन एअरटेल थॅक्स प्लॅटीनियम रिवॉर्ड्स म्हणून ६ महिने अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप देतात. दूरसंचार कंपनी याआधी या सर्व ४ प्लॅनसह १ वर्षाचा मोफत अॅमेझॉन प्राइम अॅक्सेस देत होती. एअरटेलने गॅजेट्स ३६० ला पुष्टी केली की हा नवीन बदल १ एप्रिलपासून प्रभावी आहे. याचा अर्थ असा की ज्या वापरकर्त्यांनी १ एप्रिलपूर्वी प्लॅन घेतला आहे आणि प्राइम मेंबरशिपसाठी साइन इन केले आहे त्यांना १ वर्षासाठी सबस्क्रिप्शन मिळत राहील. त्याच वेळी, त्यानंतरच्या सदस्यांसाठी सदस्यत्वाची वैधता ६ महिन्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

(हे ही वाचा: Apple देणार चाहत्यांना धक्का! सर्वात लोकप्रिय iPhone होऊ शकतो बंद; जाणून घ्या कारण)

हे लक्षात घेण्यासारखे आहे की अपडेट पोस्टपेड प्लॅनपुरते मर्यादित आहे आणि एअरटेल आपल्या ब्रॉडबँड ग्राहकांसाठी कोणतेही विशिष्ट बदल करत नाही. डिसेंबरमध्ये अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप युजर्ससाठी ५० टक्क्यांनी महाग झाली होती. सदस्यत्व सध्या १७९ रुपये प्रति महिना, ४५९ रुपये त्रैमासिक आणि १,४९९ रुपये वार्षिक उपलब्ध आहे. आता हे पाहता, एअरटेल सोबतच, इतर दूरसंचार कंपन्या देखील आगामी काळात अॅमेझॉन प्राइम सदस्यत्वासह त्यांच्या योजनांमध्ये सुधारणा करू शकतात.

अॅमेझॉन प्राइम व्यतिरिक्त, एअरटेलचे पोस्टपेड प्लॅन १ वर्षासाठी Disney+ Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शनसह येतात. त्याच वेळी, नेटफ्लिक्स बेसिक मासिक सबस्क्रिप्शन एअरटेलच्या रु १,१९९ प्लॅनमध्ये उपलब्ध आहे आणि नेटफ्लिक्स स्टँडर्ड मासिक सबस्क्रिप्शन एअरटेलच्या रु १,५९९प्लॅनमध्ये उपलब्ध आहे.