अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी एक वाईट बातमी आहे. आता अँड्रॉइड वापरकर्ते लोकप्रिय अँप YouTube Vanced चा वापर करू शकणार नाहीत. द वर्जनुसार, वॅन्स्डच्या निर्मात्यांनी येणाऱ्या काही दिवसात कायदेशीर कारणांमुळे हे अॅप्लिकेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वॅन्स्ड अॅपच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट करण्यात आली आहे. यात म्हटलंय, “वॅन्स्ड अॅप बंद करण्यात आले आहे. येणाऱ्या दिवसात, या वेबसाइटवरून डाउनलोड लिंक काढून टाकण्यात येईल. आम्हाला माहित आहे की हे तुमच्यासाठी धक्कादायक आहे. परंतू हे करणे आवश्यक आहे. वर्षानुवर्षे आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार.”
सध्या स्थापित केलेल्या आवृत्त्या २ वर्ष किंवा त्याहून अधिक जुन्या होत नाहीत तोपर्यंत चांगले काम करतील. अनवर्स्डसाठी युट्युब वॅन्स्ड ही मूळ अॅपची सुधारित आवृत्ती आहे जी वापरकर्त्यांना प्रीमियम सबस्क्रिप्शनशिवाय युट्युबवरील सर्व व्हिडीओ जाहिराती ब्लॉक करण्याची परवानगी देते.
VIDEO: पंतच्या सांगण्यावरून रोहित शर्माने घेतला DRS, निकालानंतर अश्विनने शमीसोबत जे केले ते एकदा पहाच…
युट्युब वॅन्स्ड एक असे अॅप आहे जे तुम्हाला अतिरिक्त सुविधांसह युट्युबचा वापर करण्याची परवानगी देते. या अतिरिक्त सुविधांमध्ये व्हिडीओ डाउनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध नाही. या अॅपचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन बंद असतानाही हे तुम्हाला तुमचे व्हिडिओ बॅकग्राउंडमध्ये ऐकण्याची परवानगी देते. अशा प्रकारे, तुम्ही सहजपणे संगीत ऐकू शकता आणि पॉडकास्ट ऐकण्यासाठी कधीही युट्युब वापरू शकता.