नोकरदार आणि छोटे व्यापारी नेहमीच अनेक बँकांचे क्रेडिट कार्ड सोबत ठेवतात आणि व्यवहार करत असतात. तसेच अनेकदा लोकं उपाहारगृहे, पेट्रोल पंप आदींची बिले क्रेडिट कार्डद्वारे भरतात. त्याच वेळी, क्रेडिट कार्डमध्ये बँक पेमेंटसाठी ३० दिवसांचा वेळ दिला जातो. तुम्ही जर वेळेवर पैसे भरले नाही तर बँकेकडून दंड आकारला जातो. तसेच तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो. उशीरा पेमेंटसाठी कोणती बँक किती दंड आकारत आहे ते जाणून घेऊयात.
आयसीआयसीआय बँक
ICICI बँकेने अलीकडेच क्रेडिट कार्डशी संबंधित काही शुल्कात वाढ केली आहे. ज्यामध्ये उशीरा पेमेंट चार्ज देखील आकरण्यात आला आहे. यासोबतच आयसीआयसीआय बँकेने क्रेडिट कार्डमधून व एटीएममधून पैसे काढण्यासाठी शुल्क म्हणजेच अॅडव्हान्स विथड्रॉवल चार्जमध्येही वाढ केली आहे. तुमची एकूण शिल्लक १०० रुपयांपेक्षा कमी असल्यास, बँक तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही. थकबाकी जितकी जास्त असेल तितके शुल्क जास्त असेल. ५०,००० किंवा त्याहून अधिक थकबाकी असल्यास बँक जास्तीत जास्त १२०० रुपये शुल्क आकारते. बँकेचे नवीन दर १० फेब्रुवारी २०२२ पासून लागू होतील.
स्टेट बँक ऑफ इंडिया
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया देखील त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड सुविधा प्रदान करते. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने क्रेडिट कार्ड पेमेंट दिल्यास वेगवेगळ्या रकमेसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते. ज्यात ५०० रुपयांपेक्षा कमी थकबाकी असल्यास कोणतेही शुल्क आकारले जात नाही. ५०१ ते १००० रुपयांच्या बिलावर ४०० रुपये दंड आकारला जातो. तर १००१ ते १०,००० रुपयांसाठी लेट पेमेंट शुल्क ७५० रुपये आहे. तसेच १०००१ ते २५००० रुपयांच्या बिलांसाठी ९५० रुपये इतके शुल्क आकारले जातात. त्याचबरोबर २५००१ ते ५०,००० रुपयांसाठी १,१०० रुपये शुल्क आकारले जाते. त्यात ५०, ०००च्या वरील बिलांसाठी १३०० रुपये विलंब शुल्क आकारले जाते.
Tecno Pova 5G स्मार्टफोनची लॉंचींग डेट कन्फर्म! जाणून घ्या किंमत
एचडीएफसी बँक
१०० रुपयांपेक्षा कमी बिलावर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. १०० ते ५०० रुपयांच्या बिलावर १०० रुपये विलंब शुल्क आकारले जाते. ५०१ ते ५००० रुपयांच्या बिलावर ५००रुपये तसेच ५००१-१०००रुपयांवर पेमेंट शुल्क ६०० रुपये आहे. तर १०००१ ते २५००० च्या बिलासाठी ८०० रुपये शुल्क आकारले जाते. २५००१ ते ५०,००० रुपयांसाठी ११०० रुपये शुल्क आकारले जाते. ५०,००० रुपयांपर्यंतच्या बिलांवर लेट बिल पेमेंट शुल्क १३०० रुपये आहे.