Battery Saving Tips For Laptop In Marathi : आपण सगळेच गेम खेळण्यासाठी किंवा कॉलेजपासून ते ऑफिसपर्यंतच्या सगळ्याच कामांसाठी लॅपटॉपचा उपयोग करतो, त्यामुळे लॅपटॉप हे एक अत्यंत महत्त्वाचं उपकरण बनलं आहे. आता आपण लॅपटॉपवर इतकं अवलंबून असतो, त्यामुळे कधी अचानक लॅपटॉप बंद झाला तर फारच प्रॉब्लेम येऊ शकतात. आपण दिवसभर लॅपटॉप इतका वापरतो की तो सतत चार्ज करावा लागतो आणि त्यामुळे महिनाअखेरीस भलेमोठे वीजबिल आपल्याला भरावे लागते. तर यावर उपाय म्हणून आज आम्ही अशाच काही टिप्सबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे लॅपटॉपची बॅटरी लाईफ (Battery Saving Tips For Laptop) वाढू शकते.

तर पुढील काही टिप्स तुमच्या जुन्या किंवा नवीन Windows लॅपटॉपची बॅटरी लाईफ वाढवू शकतात (Battery Saving Tips For Laptop)

तुमचा लॅपटॉप बेस्ट पॉवर एफिशिएन्सी मोडवर ठेवा (best power efficiency mode) :

Oben Electric confirms Rorr EZ Launch Date
Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Bangladesh Power Supply Alert
Bangladesh Power Supply Alert : अदानी पॉवरचा बांगलादेशला वीज खंडित करण्याचा इशारा; मोहम्मद युनूस सरकार थकीत वीज बिल भरणार?
yoga poses to relieve gas
Health Special: पोटातील गॅसवर योगासनांचा जालीम उपाय; नेमके काय कराल? – भाग २
Aloo Bhujia Recipe
आलू भुजिया बनवण्याची सोपी रेसिपी नक्की ट्राय करा; वाचा साहित्य आणि कृती
Coconuts Are Not Allowed On Planes
Coconuts Are Not Allowed On Planes : विमान प्रवासात नारळ घेऊन जाण्यावर का आहे बंदी? वाचा नियम, तोटे अन् तज्ज्ञांचे मत
Make malpuwa at home
घरच्या घरी ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा मालपुवा; वाचा साहित्य आणि कृती
puri making tips
सणासुदीला टुमदार, लुसलुशीत पुरी बनवायची आहे? ‘या’ महत्त्वाच्या टिप्स करा फॉलो

बहुतेक Windows लॅपटॉप बॅटरीवर चालतात आणि ऑटोमॅटिक बॅलेन्स पॉवर मोडवर जातात. त्याचप्रमाणे विंडोज लॅपटॉपमध्ये तीन पॉवर मोड ऑफर करतात – १. बेस्ट पेर्फोमन्स, २. बॅलेन्स आणि ३. बेस्ट पॉवर एफिशिएन्सी. बेस्ट पॉवर एफिशिएन्सीवर लॅपटॉप सेट करून, युजर्स बॅटरी लाईफ लक्षणीयरीत्या सुधारू शकतात (Battery Saving Tips For Laptop). बेस्ट पॉवर मोडमध्ये युजर्सना लॅपटॉप वापरताना स्पीड कमी होण्याचा अनुभव येणार नाही, पण मल्टीटास्किंग किंवा गेमिंग करताना हा मोड सर्वोत्तम कार्यप्रदर्शन प्रदान करणार नाही.

ऑटो एनर्जी सेवरला एनेबल करा (Enable auto energy saver at low power) :

लॅपटॉपची बॅटरी कमी चार्ज झाल्यावर बऱ्यापैकी लवकर संपते. अशावेळी Windows 11 युजर्सना ऑटोमॅटिकली एनर्जी सेव्हिंग मोड एनेबल करण्याची परवानगी देते, त्यामुळे लॅपटॉपची बॅटरी ३० टक्के झाल्यावर ऑटो एनर्जी सेव्हर मोड एनेबल करणे योग्य ठरेल.

हेही वाचा…OpenAI’s Search Engine : OpenAI चे नवे सर्च इंजिन! अचूक माहिती शोधणे होणार सोपे; विनामूल्य करता येईल वापर

ऑटो टर्न-ऑफ स्क्रीन आणि हायबरनेशन एनेबल करा (Enable auto turn-off screen and hibernation) :

जेव्हा तुमच्या लॅपटॉपची स्क्रीन चालू राहते, तेव्हा तुम्ही डिव्हाइस वापरत नसाल तरीही बॅटरी संपत राहते, त्यामुळे ऑटो टर्न-ऑफ स्क्रीन एनेबल करा. उदाहरणार्थ तीन मिनिटांनंतर स्क्रीन आपोआप बंद होते आणि हायबर्नेशन मोड सुरू होतो, यामुळे तुम्ही लॅपटॉपची बॅटरी लाईफ आणखी वाढवू शकता

ऑटो ब्राईटनेस एनेबल करा (Enable auto brightness on laptop) :

हा फीचर काही लॅपटॉप्सपर्यंतच मर्यादित आहे, पण एकदा चालू केला की तो स्क्रीनची ब्राइटनेस आपोआप कमी किंवा जास्त करतो, ज्यामुळे पॉवर कंझम्पशन खूप कमी होऊ शकते. स्मार्टफोनप्रमाणे हा फीचर आसपासच्या प्रकाशाचा तपास करून स्क्रीनची ब्राइटनेस सेट करतो, जेणेकरून स्क्रीन दिसत राहते आणि कमी पॉवर वापरली जाते.