एका अहवालानुसार, असं समोर आलंय की, मेटा-मालकीचे इन्स्टाग्राम आपल्या वापरकर्त्यांच्या एक्टिविटी , मजकूर निवड, मजकूर इनपुट आणि पासवर्ड माहिती ट्रॅक करू शकते. फेलिक्स क्रॉसने केलेल्या विश्लेषणात असे आढळून आले की आयओएस वरील इन्स्टाग्राम आणि फेसबूक दोन्ही थर्ड पार्टी अॅप्ससाठी ॲप्पल द्वारे ऑफर केलेल्या ब्राउजर ऐवजी त्यांचे स्वतःचे अॅप-मधील ब्राउझर वापरतात. फेलिक्स क्रॉसच्या मते, त्यांच्या कस्टम बिल्ट ब्राउझरमधून, इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या सर्व लिंक्स आणि वेबसाइट्समध्ये Meta Pixel नावाचा ट्रॅकिंग JavaScript कोड इंजेक्ट करतात. हा कोड मेटाला वापरकर्त्यांच्या संमतीशिवाय त्यांचे संभाषण ट्रैक करण्याची परवानगी देतो. हे इन्स्टाग्रामला वापरकर्त्यांच्या किंवा वेबसाइट प्रदात्याच्या संमतीशिवाय बाह्य वेबसाइटवर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे परीक्षण करण्याची अनुमती देते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा