ॲपल कंपनीचे आयफोन अनेक ग्राहकांना आकर्षित करतात. आयफोन १५ (iPhone 15) मॉडेल यावर्षी सप्टेंबरमध्ये लाँच करण्यात आला होता, तर आता कंपनी लवकरच त्यांचा नवीन मॉडेल घेऊन येणार आहे. कंपनी आयफोन १६ लाँच करणार आहे. आयफोन १६ च्या लाँचला अजून खूप वेळ आहे. कंपनी आपलं नवीन मॉडेल आणखी चांगल्या प्रकारे काम करेल ह्याची योजना बनवत आहे. पण, यापूर्वी आयफोन १६ सीरिजबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. आयफोन १६ मध्ये डिस्प्ले, कॅमेरा, डिझाईन, चिपसेट हे फिचर कसे असणार आहेत, चला जाणून घेऊयात…

आयफोन १५ नंतर आयफोन १६ ची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याचे लाँचिंग २०२४ मध्ये होणार आहे, असे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात कंपनीने अधिकृत कोणतीही माहिती दिली नाही. पण, आयफोन १६ लाँच होण्यापूर्वीच त्याची झलक, फिचर्स, डिझाईन आणि लूक समोर आला आहे.

Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
school students ai education
नवे वर्ष ‘एआय’चे; शिक्षण संस्थांना काय करावे लागणार?
Apple smart doorbell camera uses Face ID to unlock your door
Apple Smart Doorbell: आता घराचे कुलूप उघडेल चावीशिवाय! ॲपलची नवीन डोअरबेल; चेहरा बघून उघडणार दार
Loksatta kutuhal Artificial Intelligence and Power Supply
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विद्युत पुरवठा
Lokstta lokrang Journalism Law Director Documentary
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले:  कॅमेरा अँगल आणि जंपकट्स पलीकडले…
Nana Patekar Aamir Khan Video viral
Video: मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकर व आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी साधेपणाचं करताहेत कौतुक

डिस्प्ले (Display) :

ॲपल कंपनीचा आयफोन १६ प्रो (iPhone 16 Pro) मध्ये ६.३ इंचाचा डिस्प्ले असेल असा अंदाज आहे. तसेच आयफोन १६ प्रो मॅक्सची (iPhone 16 Pro Max ) स्क्रीन ६.९ इंचाची असू शकते. आयफोन १६ आणि आयफोन १६ प्लस मोबाईलचा आकार मोठा असेल अशी अपेक्षा करणाऱ्या वापरकर्त्यांची निराशा होऊ शकते. कारण, या मॉडेल्सची रचना आधीच्या मोबाईलसारखी ठेवली जाणार आहे. आगामी आयफोन सॅमसंगने पुरवलेल्या ओएलईडी (OLED) मटेरियलमध्ये बदलू शकतात. तसेच आयफोनची पॉवर वाढवण्यासाठी ब्ल्यू फॉस्फोरेसेन्ससह ब्लू फ्लोरोसेंट तंत्रज्ञान बदलू शकतात.तसेच मायक्रो एलईडी डिस्प्ले तंत्रज्ञानाचा समावेश करण्याबद्दलदेखील अंदाज वर्तवला जातो आहे.

डिझाईन (Design) :

पुढच्या वर्षी लाँच करण्यात येणाऱ्या या आयफोनमध्ये सॉलिड स्टेट बटण (solid-state buttons) दिसू शकतात. ॲपल आयफोन १६ प्रो मॉडेल्समध्ये हे “कॅप्चर बटण” या नावाने ओळखले जाईल. पारंपरिक मेकॅनिकल बटणांऐवजी कॅपेसिटिव्ह बटणे म्हणून वर्णन केलेले हे फिचर टच डिटेक्ट करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. हे बटण आयफोन एसई (iPhone SE) सीरिजप्रमाणेच आहे.

हेही वाचा…इन्स्टाग्राम रील आता सहज करता येईल डाउनलोड; फॉलो करा ‘या’ स्टेप्स

चिपसेट (Chipset) :

ॲपल कंपनीने आयफोन १६ मधील चिपसेटबद्दल अद्याप काहीही सांगितलेलं नाही. पण, कदाचित आयफोन १५ प्रो मॉडेलप्रमाणे ए १७ प्रो चिप (A17 Pro chip) या नवीन आयफोनमध्येसुद्धा असू शकते. तसेच आयफोनसाठी तीन नॅनोमीटर ए१८ (A18) चिप ऑफर करण्याचा निर्णयदेखील घेऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

कॅमेरा (Camera) :

ॲपल कंपनीचा आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्समध्ये ‘ट्रेटा-प्रिझम’ टेलिफोटो काढण्यासाठी ऑप्टिकल झूम ३एक्स ते ५एक्स (3x – 5x) पर्यंत असेल. आयफोन १६ प्रो मॉडेलची ४८ (48) मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा असू शकतो असेदेखील सांगण्यात येत आहे. ज्यामुळे कमी प्रकाशात जास्तीस्त जास्त चांगले फोटो काढण्यात येतील.

त्यामुळे आता या खास फिचरमुळे आयफोन १६ ची चर्चा जोरात सुरू आहे.

Story img Loader