Elon musk no longer richest man : टेस्लाचे संस्थापक आणि ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते. मात्र, आता ही जागा दुसऱ्या व्यक्तीला मिळाली आहे. रिअल टाइम बिलिऑनेर लिस्टनुसार, सोमवारी टेस्लाचे शेअर्स ४ टक्क्यांनी घटले ज्यामुळे मस्क यांना जवळपास ७०० कोटींचे नुकसान झाले. यामुळे एलव्हीएमएचचे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्नार्ड आरनॉल्ट हे श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर विराजमान झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फोर्ब्सच्या अहवालानुसार, बुधवार पर्यंत (अमेरीकेच्या वेळेनुसार मंगळवारी सवादहा वाजता) मस्क यांची संपती १७६.८ अब्ज डॉलर्स होती जी बर्नार्ड आरनॉल्ट यांच्या १८८.२ अब्ज डॉलर्स संपतीपेक्षा ११.८ अब्ज डॉलर्स कमी आहे.

(BLUTOOTH CALLING आणि १२० स्पोर्ट्स मोडसह लाँच झाली ‘ही’ SMARTWATCH, किंमत केवळ १९९९ रुपये)

गुंतवणूकदारांचा मस्क यांच्यावरील विश्वास उतरल्याने शेअर्सना नुकसान झाल्याचे, तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ऑक्टोबर महिन्यात ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर मस्क सध्या ट्विटर विकसित करण्यावर भर देत आहेत, त्यांनी इतर व्यवसायांवरून लक्ष वळवल्याचे म्हटले जाते. कदाचित यामुळे हा फटका बसल्याची शक्यता आहे.

कोण आहेत बर्नार्ड आरनॉल्ट?

बर्नार्ड आरनॉल्ट हे फ्रेंच व्यावसायिक असून ते एलव्हीएमएच मोट हेनेसी आणि लुइस विटॉन ग्रुपचे कार्यकारी अधिकारी आहेत. आरनॉल्ट आणि कुटुंबाकडे जवळपास ७० कंपन्या आहेत. यामध्ये क्रिश्चियन दिओर फेंदी, गिवेन्ची, मार्क जाकोब्स, स्टेला मकार्टनी, लोरो पिआना, केन्झो, सेफोरा आणि इतर कंपन्यांचा समावेश आहे.

12 अब्ज डॉलेरपेक्षा जास्त वाढीची आवश्यकता

विशेष म्हणजे, अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकासाठी मस्क आणि आरनॉल्ट यांच्यात जोरदार चुरस होती. आरनॉल्ट गेल्या आठवड्यात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते, परंतु त्यांचे स्थान अल्पकाळ टिकले आणि मस्क एका दिवसात पुन्हा पहिल्या स्थानावर आले. मात्र, यावेळी त्यांच्या संपत्तीमधील फरक लक्षणीय आहे. पहिल्या स्थानावर येण्यासाठी मस्क यांना 12 अब्ज डॉलेरपेक्षा जास्त वाढीची आवश्यकता असेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bernard arnault became world richest man elon musk no longer richest man ssb