देशातील अनेक शहरांमध्ये आता ५ जी सेवा सुरू झाली आहे. या सेवेचा आनंद घेण्यासाठी तुम्ही ५ जी फोन घेण्याचा विचार करत असाल तर बाजारात आता अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. प्रिमियम फोनसह बजेट फोन्स देखील उपलब्ध आहेत. तुमचे बजेट १५ हजार रुपयांपर्यंत असेल तर या किंमतीच्या आत काही ५ जी फोन्स उपलब्ध आहेत. हे फोन्स तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतात.

१) आयक्यूओओ झेड ६ लाइट ५ जी

rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
rap songs campaigning
प्रचारासाठी ‘रॅप’चा ठेका, मतदारांना आकर्षित करण्याकडे उमेदवारांचा कल
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !

iQOO Z6 Lite 5G स्मार्टफोन हा तुमच्यासाठी उत्तम फोन ठरू शकतो. फोनमध्ये तुम्हाला १८ वॉटची फास्ट चार्जिंग, व्यत्ययाशिवाय कार्य होण्यासाठी नवीन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४ जेन १ प्रोसेसर, ६.६८ इंचचा डिस्प्ले आणि दीर्घकाळ काम करता यावे यासाठी ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. उत्तम छायाचित्र मिळण्यासाठी फोनमध्ये ५० एमपीचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. मात्र, या फोनसह चार्जर मिळत नाही. चार्जरसाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागेल.

(युजरशिवाय इतर कोणीही चॅट्स पाहू शकणार नाहीत, व्हॉट्सअ‍ॅप ‘या’ फीचरवर करतंय काम)

महत्वाचे म्हणजे, कंपनी या फोनसाठी दीर्घकालीन सॉफ्टवेअर सपोर्ट देत आहे. दोन वर्षांच्या अँड्रॉइड अपडेटसह तुम्हाला तीन वर्षांचे सुरक्षा पॅचेस देखील मिळतील. हा फोन फ्लिपकार्टवर १३ हजार ९९० रुपयांना मिळत आहे.

२) सॅमसंग गॅलक्सी एम १३ ५ जी

मोठी स्क्रिन आणि दीर्घकाळ चालणारी बॅटरीची गरज असणाऱ्यांसाठी Samsung Galaxy M13 5G फोन हा चांगला पर्याय ठरू शकतो. फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी, ६.५ इंचची एलसीडी स्क्रिन, अडथळ्याशिवाय काम करता येण्यासाठी मीडियाटेक डायमेन्सिटी ७०० चीप, १५ वॉट चार्जर आणि चांगली छायाचित्रे मिळण्यासाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर हा फोन १४ हजार २९९ रुपयांना मिळत आहे.

(ट्विटरमधून काढूल टाकलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेणार ‘ही’ कंपनी, भारतात ट्विटरला देतंय टक्कर)

३) पोको एम ४ ५ जी स्मार्टफोन

Poco M4 5G स्मार्टफोनची किंमत वर उल्लेख केलेल्या फोन्सच्या तुलनेत कमी आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७०० एसओसी प्रोसेसर देण्यात आले आहे. या प्रोसेसरमुळे तुमची मुलभूत कामे सहज होऊ शकतात. फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली असून १८ वॉट फास्ट चार्जिंग सुविधा मिळते. उत्तम छायाचित्र मिळण्यासाठी फोनमध्ये ५० एमपीचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी पुढे १६ एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोन ६.५८ इंच फूल एचडी स्क्रिनसह उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर हा फोन १२ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे.