तुम्ही 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. जवळपास १ महिन्यात देशात 5G नेटवर्क सुरू होईल. OnePlus, Motorola, Redmi, Realme, iQOO सारख्या कंपन्या सतत परवडणारे हँडसेट लॉंच करत आहेत. आज आम्ही तुम्हाला 5G ला सपोर्ट करणार्या २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या टॉप ५ स्मार्टफोन्सबद्दल सांगत आहोत.
OnePlus Nord 2 CE Lite 5G: १९,९९९ रूपये
तुम्हाला २० हजार रुपयांच्या खालील किंमत असलेले ऑलराउंडर 5G फोन घ्यायचा असेल तर OnePlus Nord CE 2 Lite 5G हा एक उत्तम पर्याय आहे. या OnePlus स्मार्टफोनमध्ये १२० Hz च्या रिफ्रेश रेटसह LCD स्क्रीन आहे. हा फोन ३३ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे की तो ३० मिनिटांत शून्य ते ५० टक्के चार्ज होईल. OnePlus Nord CE2 Lite 5G देशात पाच 5G बँडला सपोर्ट करतो.
आणखी वाचा : ७९९ रूपयांचा Jio चा पोस्टपेड-प्रीपेड प्लॅन: Netflix, Prime Video आणि Hotstar मोफत, अनलिमिटेड कॉल, डेटा
Moto G62 5G: १७,९९९ रूपये
तुम्हाला क्लीन Android अनुभव असलेला फोन हवा असेल, तर Moto G62 5G हा एक उत्तम पर्याय आहे. हा फोन 5G बँडला सपोर्ट करतो जो या किमतीतला सर्वोत्तम फोन आहे. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर देण्यात आला आहे. Moto G62 5G मध्ये ५००० mAh बॅटरी आहे जी १५ W जलद चार्जिंगला सपोर्ट करते.
Redmi Note 11T 5G: १५,९९९ रूपये
Redmi Note 11T 5G स्मार्टफोन हा कंपनीचा आणखी एक उत्कृष्ट 5G स्मार्टफोन आहे. या Redmi फोनमध्ये MediaTek Dimensity 810 octa-core 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ६.६ इंच फुलएचडी + डॉट डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सेल हाय रिझोल्यूशन प्रायमरी, ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे, १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरासहहा फोन येतो. हँडसेटला पॉवर देण्यासाठी ३३ W प्रो फास्ट चार्जिंगसह ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. यात ६ GB आणि १२८ GB इनबिल्ट स्टोरेज आहे. फोनला Android 11 आधारित MIUI १२.५ स्किन मिळते.
आणखी वाचा : Apple iPhone 14 पासून Redmi 11 Prime पर्यंत…या आठवड्यात हे स्मार्टफोन होतील लॉंच
iQoo Z6 5G: १६,९९९ रूपये
IQ च्या या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सेल आय ऑटोफोकस प्रायमरी सेन्सर आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे.
Realme 9 5G: १५,९९९ रूपये
Redmi 9 5G मध्ये Amoled डिस्प्ले देण्यात आला आहे जो ९० Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे जी १८ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज सह येतो. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येते. हँडसेटमध्ये ६.५ इंचाचा फुलएचडी + डिस्प्ले आहे. ४८ मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह फोनमध्ये २ मेगापिक्सलचे दोन सेन्सर देखील देण्यात आले आहेत. सेल्फी कॅमेरा १६ मेगापिक्सेलचा आहे. हँडसेटला पॉवर देण्यासाठी ५००० mAh बॅटरी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह येतो.