Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea (Vi) या देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्या आहेत. तिन्ही दूरसंचार ऑपरेटर लवकरच देशात 5G नेटवर्क लॉंच करण्यासाठी तयार आहेत, याचा अर्थ असा आहे की, तुम्ही देखील एक चांगला 5G फोन घेण्याचा विचार करत असाल, जर तुमचे बजेट २०,००० ते ३०,००० रुपयांच्या दरम्यान असेल आणि तुम्ही कोणता फोन घ्यावा या संभ्रमात असाल तर आम्ही तुम्हाला मदत करू. आम्ही तुम्हाला त्या 5G स्मार्टफोनबद्दल सांगू जे भारतातील बहुतेक 5G बँडला सपोर्ट करतात. OnePlus, Oppo, Motorola, Samsung, Xiaomi आणि 5G बँड सपोर्ट असलेल्या बहुतांश हँडसेटच्या उत्कृष्ट फीचर्सबद्दल जाणून घ्या…
OnePlus Nord 2T 5G
OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोन जो मागील वर्षी लॉंच झाला होता, या वर्षी मे मध्ये लॉंच झाला होता आणि तो ३०,००० रुपयांपेक्षा कमी रेंजमध्ये येतो. OnePlus Nord 2T 5G मध्ये MediaTek Dimensity 1300 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये ६.४३ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट ९० Hz आहे. हा फोन HDR10+ सपोर्टसह येतो. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज असलेल्या फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत २८,९९९ रुपये आहे.
आणखी वाचा : Bike Mileage Increase Tips: बाईकच्या मायलेजची चिंता वाटतेय? मग या ५ टिप्स समस्या दूर करतील
Oppo Reno8
या वर्षी जुलैमध्ये लॉंच झालेल्या Oppo Reno 8 ला Android १२ आधारित ColorOS १२.१ देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये MediaTek डायमेंशन १३०० प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ८ GB पर्यंत रॅम आणि २५६ GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाची AMOLED स्क्रीन आहे जी ९० Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. फोन ८० W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. स्मार्टफोनची किंमत २९,९९९ रुपयांपासून सुरू होते.
Motorola Edge 30
Motorola Edge 30 हा एक उत्तम मिड-रेंज फोन आहे, ज्यामध्ये ६.५ इंच AMOLED स्क्रीन आहे. हा फोन HDR10+ ला सपोर्ट करतो आणि त्याचा रिफ्रेश रेट १४४ Hz आहे. हँडसेटमध्ये Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसर देण्यात आला आहे आणि तो Android १२ सह येतो. फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २७,९९९ रुपये आहे तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २९,९९९ रुपये आहे.
आणखी वाचा : केवळ ३० हजारात मिळतेय Bajaj Pulsar NS200, वाचा ऑफर
Samsung Galaxy A52s 5G
Samsung Galaxy A52S 5G मध्ये Qualcomm Snapdragon ७७८ प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाची सुपर AMOLED स्क्रीन आहे जी १२० Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह बेस व्हेरिएंटची किंमत २७,९९९ रुपये आहे.
Xiaomi 11i Hypercharge
Xiaomi 11i हायपरचार्ज या वर्षी लॉंच करण्यात आला. हा फोन MediaTek Dimensity 920 चिपसेट सह येतो. या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंच १२० Hz AMOLED डिस्प्ले आहे. हँडसेटमध्ये १२० W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, या टेक्नॉलॉजीमुळे फोन फक्त १५ मिनिटांत शून्य ते १०० टक्के चार्ज होतो.
Poco F4
Poco F4 स्मार्टफोन हा ३०,००० रुपयांच्या अंतर्गत बेस्ट फोनपैकी एक आहे. यात Qualcomm Snapdragon ८७० चिपसेट आहे. हा फोन Android १२ आधारित MIUI १३ सह येतो. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटच्या बेस मॉडेलची किंमत २७,९९९ रुपये आहे.