लेनोवो (Lenovo) कंपनी दिवाळीनिमित्त “दिवाळी धमाका सेल” घेऊन आली आहे. ग्राहकांना लॅपटॉप, टॅबलेट आणि इतर वस्तूंवर ६० टक्क्यांपर्यंतची सूट मिळणार आहे. कंपनी सर्व बँकेच्या क्रेडिट कार्डवर १० टक्यांपर्यंत कॅशबॅक आणि उत्पादन एक्स्चेंजवर ७,००० पर्यंतचा एक्स्चेंज बोनसदेखील देत आहे. तसेच ते त्यांच्या प्रोडक्टसवर सहा महिन्यांसाठी नो कॉस्ट ईएमआय (no-cost EMI) देखील देणार आहेत. या दिवाळीत लॅपटॉप, टॅबलेट खरेदी करणाऱ्या इच्छुकांसाठी अगदीच बेस्ट आणि बजेटमधली ही ऑफर आहे.

लेनोवो दिवाळी धमाका सेल : लॅपटॉप ऑफर

Toyota has launched the special edition versions For year end
Toyota Year End Deals : टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच; कारच्या खरेदीवर मिळणार भरपूर अ‍ॅक्सेसरीज
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
alia bhatt diwali yellow saree is plant dyed and recycled from florals
झेंडुच्या फुलांचा असाही पुनर्वापर! आलिया भट्टने दिवाळीला नेसलेल्या साडीत काय आहे खास? किंमत ऐकून व्हाल थक्क
Daughter Gifted Her Father Little Ring
‘हे माझं स्वप्न होतं…’ लेकीनं दिवाळीनिमित्त दिलं खास, महागडं गिफ्ट; VIDEO तून पाहा बाबांची पहिली रिअ‍ॅक्शन
Husband picking up wife and play game see waht happend next funny video goes viral
“भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Women Fall From A Plastic Bucket While Standing On It To Check The Quality Funny Video Viral
“देवा काय करावं या बायकांचं?” क्वालिटी चेक करायला १५० रुपयांच्या बादलीवर उभी राहिली अन् तोल गेला; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

लेनोवो कंपनी लॅपटॉपवर ४८ टक्क्यांपर्यंत सूट देणार आहे. थिंकपॅड, आयडियापॅड, लीजन, योगा सीरिज आदी गोष्टींचा यामध्ये समावेश असेल. थिंकपॅड ई१६ (Think pad E16) ज्यामध्ये १३ जेन इंटेल आय५ प्रोसेसर (13th Gen intel i5), १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी एसएसडी (512 GB SSD) हार्ड ड्राइव्ह आहे, ज्याची किंमत ७१,९९० रुपये इतकी आहे आणि जी मूळ किमतीपेक्षा ४१ टक्क्यांनी कमी आहे. तसेच लेनोवोचे सर्वाधिक विकले जाणारे थिंकपॅड; ज्यात ई-१६ (E16) व एएमडी रायझेन ५ प्रोसेसर(AMD Ryzen 5 ), १६ जीबी रॅम, ५१२ जीबी एसएसडी हार्ड ड्राईव्ह आणि एक एकीकृत एमडी रेडिओन (AMD Radeon) ग्राफिक्स कार्ड आहे. हे थिंकपॅड ३६ टक्क्यांची सूट देत ६१,९९० रुपयांमध्ये उपलबध आहे.

तसेच लेनोवोचा ११वा जनरल इंटेल आय७ (11th Gen Intel i7), १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी एसएसडी हार्ड ड्राइव्ह असलेल्या आयडियापॅड स्लिमची (Ideapad Slim) किंमत ३६ टक्क्यांच्या सवलतींवर ५०,७९० रुपयांना उपलब्ध आहे. लेनोवो प्रीमियम लॅपटॉप सीरिज लीजन ५प्रो (Legion 5 Pro) देखील ११२,४९० मध्ये उपलब्ध आहे आणि या खास ऑफेरमुळे तुम्ही ९७,४०० पर्यंत बचत करू शकता.

(हे ही वाचा : २०,४०० रुपयात खरेदी करा iPhone 14! फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये भन्नाट ऑफर, पाहा प्लॅन )

लेनोवो दिवाळी धमाका सेल : टॅबलेटवर ऑफर

लेनोवो लॅपटॉपसह त्यांच्या नवीन लाँच झालेल्या उपकरणांवरसुद्धा सवलत देत आहे. टॅबलेटवर ५१ टक्के सूट मिळणार आहे. लेनोवोचा नुकताच लाँच झालेल्या टॅब पी११ (Tab P11) ज्यामध्ये मीडियाटेक हेलिओ जी९९ प्रोसेसर (MediaTek Helio G99 processor), ६ जीबी रॅम, १२८ जीबी इंटर्नल मेमरी आहे. या डिव्हाइसवर तुम्हाला ५१ टक्के सूट मिळाल्यानंतर तुम्हाला हा टॅबलेट १९,९९९ रुपयांमध्ये मिळेल. तसेच लेनोवोचा सर्वाधिक विकला जाणारा टॅब एम १० (M10) ज्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी अंतर्गत हार्ड ड्राइव्ह आहे. या टॅबवर ५३ टक्के सूट देऊन, १७,०००१ रुपयांची बचत करून तुम्हाला हा १४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.

लेनोवो दिवाळी धमाका सेल : इतर उपकरणे

लेनोवोच्या हेडसेट, मॉनिटर्स आणि इतर उत्पादनांसह त्यांच्या इतर अ‍ॅक्सेसरीजवरदेखील सूट आहे. लेनोवोचा एसेन्शियल वायरलेस माउस आणि की-बोर्ड सेट ६३ टक्के सवलतींवर १,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. तसेच लेनोवोचा जी२४-२० एफएचडी (G24-20 FHD) गेमिंग मॉनिटर जो २३.८ इंचाचा आहे, जो ४६ टक्के सवलतीवर १२,६४३ रुपयांमध्ये उपल्बध आहे. तसेच मूळ किमतीपेक्षा तुम्हाला या ऑफरमुळे ११,०५६ रुपयांची सवलत मिळणार आहे. तसेच या व्यतिरिक्त ग्राहकांनी खरेदीदरम्यान क्रेडिट कार्डचा वापर केल्यास त्यांना १० टक्के कॅशबॅक मिळण्याचीदेखील संधी आहे.

(टीप : या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना लेनोवोच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तसेच वस्तूंची खात्री करून ग्राहकांनी खरेदी करावी.)