Flipkart black friday sale : फ्लिपकार्टने ब्लॅक फ्रायडे सेल सुरू केला असून त्यात अनेक गॅजेट्सवर मोठी सूट मिळत आहे. या सेलमध्ये आयसीआयसीआय बँक कार्ड, कोटक बँक कार्ड आणि सिटी बँक कार्डचा वापर करून फोन खरेदी केल्यास ग्राहक १२ टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकतात. यासह फ्लिपकार्टकडून एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट ईएमआय आणि स्क्रिन डॅमेज प्रोटेक्शन देखील मिळत आहे. पे लेटर पर्याय देखील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही नवीन फोन घेण्याच्या तयारीत असाल तर सेलमध्ये काही स्मार्टफोन्सवर सर्वोत्तम डिल्स मिळत असून त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता.

१) इन्फिनिक्स हॉट १२

ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच जिंका!
ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच जिंका!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Airtel vs Jio vs Vi Recharge Plans
Airtel vs Jio vs Vi: फक्त कॉल आणि एसएमएस रिचार्जकरिता कोण देत आहे सर्वात स्वस्त प्लॅन? रोजचा खर्च येईल फक्त ५ रुपये
Airtel 90-Day Recharge Plan
Airtel चा स्वस्तात-मस्त प्लॅन! डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे; केवळ इतक्या किंमतीत मिळेल ९० दिवसांची व्हॅलिडिटी
How to send WhatsApp messages without save a number know 5 easy methods
मोबाइल नंबर सेव्ह न करता WhatsApp मेसेज कसा पाठवायचा? जाणून घ्या पाच सोप्या पद्धती…
Jio, Airtel and Vi Voice and SMS Plan
Voice and SMS Plan : जिओ, एअरटेल की व्हीआय? कोणता रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरेल बेस्ट; वाचा यादी
IMEI Number for mobile phone
चोरी गेलेला मोबाईल पुन्हा मिळवण्यासाठी IMEI नंबर आहे महत्त्वाचा, कसा मिळवाल ‘हा’ क्रमांक? जाणून घ्या
Republic Day Sale Realme GT 6 Get massive discount
Republic Day Sale : रिअलमीच्या ‘या’ स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट; मिळवा सात हजारांपर्यंतची सवलत

Infinix Hot 12 या स्मार्टफोनचे ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी रॉम असलेले व्हेरिएंट १२ हजार ९९९ रुपयांऐवजी ८ हजार ७९९ रुपयांना मिळत आहे. फोनवर ८ हजार २०० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज ऑफरही मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये अडथळ्याशिवाय कार्य होण्यासाठी मीडियाटेक हेलिओ जी ३७ प्रोसेसर देण्यात आले असून ६.८२ इंच एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळत आहे.

(३२ तासांची बॅटरी लाइफ, वाढवू शकता रॅम; LAVA BLAZE NXT ग्राहकांसाठी सादर, जाणून घ्या किंमत)

२) रिअलमी सी ३३

Realme C33 स्मार्टफोनचे ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी रॉम व्हेरिएंट ११ हजार ९९९ रुपयांऐवजी ८ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळत आहे. या फोनवर ८ हजार ४०० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. फोनमध्ये ६.५ इंच एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला असून ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

३) मोटोरोला जी २२

फ्लिपकार्टवर Motorola g22 स्मार्टफोनची मूळ किंमत १३ हजार ९९९ रुपये असून त्यामध्ये ४ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन ९ हजार ९९९ रुपयांना मिळत आहे. फोनवर ९ हजार ४५० रुपयांचा एक्सचेंज ऑफरही मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच एचडी प्लस डिस्प्ले, ५ हजार एमएएचची बॅटरी, क्वाड कॅमेरा सेटअप आणि मीडियाटेक हेलिओ जी ३७ प्रोसेसर देण्यात आले आहे.

Story img Loader