भारतीय बाजारपेठेत सध्या एकापेक्षा एक जबरदस्त लॅपटॉप्स उपलब्ध आहेत. जर तुमचे बजेट ३० हजार रुपयांच्या जवळ असेल आणि तुम्ही एक शानदार लॅपटॉप विकत घेऊ शकता. शानदार प्रोसेसर, रॅमसह अनेक दमदार फीचर्स येतात. चला तर पाहूया कोणते आहेत हे लॅपटॉप्स…
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
३० हजारांच्या बजेटमधील ‘हे’ आहेत सर्वोत्तम लॅपटॉप्स
- Asus Vivobook Go 15: हा लॅपटॉप Celeron Dual Core प्रोसेसरसह येतो आणि ८GB RAM आणि ५१२GB SSD आहे. यात १५.६-इंचाचा डिस्प्ले देखील आहे. हे फ्लिपकार्ट वरून २७,९०० रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.
- HP 255 G8: तुम्हाला Chromebook ऐवजी HP लॅपटॉप हवा असल्यास हे मॉडेल तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. हे मॉडेल ८GB रॅम, ५१२GB स्टोरेज आणि AMD Ryzen 3 सीरीज CPU सह येते. हे Amazon वरून २९,९९० रुपयांना खरेदी करता येईल.
(हे ही वाचा : Realme C53 Vs Nothing Phone (2): कॅमेरा, बॅटरी आणि फीचर्समध्ये कोणता स्मार्टफोन्स ठरतो बेस्ट? किंमत फक्त…)
- HP Chromebook 15.6: हा लॅपटॉप Intel Celeron N4500 प्रोसेसर आणि चांगल्या बिल्ड गुणवत्तेसह येतो. यामध्ये वेब ब्राउझिंग आणि कंटेंट वॉचिंग आरामात करता येते. भारतात त्याची किंमत २८,९९९ रुपये आहे.
- Infinix INBook Y1 Plus: या यादीतील हा सर्वात स्टायलिश लॅपटॉप आहे. हे 10th-gen Intel Core i3 प्रोसेसरसह येते. यात १५.६-इंचाचा डिस्प्ले देखील आहे. हे फ्लिपकार्ट वरून २८,९९० रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.
- Lenovo IdeaPad 1: हा लॅपटॉप ११.६-इंचाच्या डिस्प्लेसह येतो आणि ४GB RAM, २५६GB SSD आणि Windows 11 OS सह येतो. फ्लिपकार्टवर त्याची किंमत २५,२८९ रुपये आहे.
First published on: 21-07-2023 at 10:45 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best five laptops under thirty thousand in india know which one is best for you pdb