यंदाचे म्हणजेच २०२३ च्या सर्वोत्कृष्ट गेम्स, ॲप्सची निवड ॲपल आणि गुगलने केलेली आहे. परंतु, सर्वात प्रगत असणारे AI तंत्रज्ञान आणि सध्या चांगलेच चर्चेत असणारे चॅट जीपीटी यांना मात्र या यादीमध्ये स्थान मिळाले नसल्याचे समोर आले आहे. या सर्व पुरस्कारांमध्ये ॲपल स्टोअरने कोणत्या ॲप्सना कोणते पुरस्कार दिले आहेत ते पाहा.

ॲपल ॲप स्टोअर पुरस्कार विजेते

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Aai Kuthe Kay Karte
अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ
Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट

सर्व ॲपल ॲप स्टोअर पुरस्कारांमध्ये, कम्युनिटीद्वारे चालवले जाणारे आणि बाहेर फिरण्याची आवड असणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करणारे ऑलट्रेल्स [AllTrails] या ॲपने जागा पटकावली असून, प्रीट-ए-मेकअप [Prêt-à-Makeup] ॲपला यावर्षीचे सर्वोत्कृष्ट आयपॅड ॲप म्हणून स्थान मिळाले आहे. या ॲपद्वारे अतिशय खरा वाटणारा असा मेकअप स्केचपॅडवर केला जाऊ शकतो. या ॲपचा उपयोग व्यावसायिकांपासून ते सामान्यांपर्यंत केला जाऊ शकतो. फोटोमेटर [Photomator] हे ॲप, ॲपलचे मॅक ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले आहे. [MUBI] मुबीला, ॲपल ॲप ऑफ द इयर म्हणून मान मिळाला आहे.

गेमिंग विभागामध्ये होनकाई: स्टार रेल [Honkai: Star Rai] याला सर्वोत्कृष्ट गेमचा मान मिळाला असून, लॉस्ट इन प्लेला [Lost in Play] यावर्षीचा ‘आयपॅड ऑफ द इयर’ म्हणून घोषित केले आहे. लाईज ऑफ पी [Lies of P] या गेमला मॅक गेम ऑफ द इयर म्हणून मान मिळाला आहे. ॲपल आर्केडचा, हॅलो किट्टी आयलंड ॲडव्हेन्चर [Hello Kitty Island Adventure] या गेमला ॲपल आर्केड ऑफ द इयर म्हणून घोषित केले गेले आहे.
हे सर्व ॲपल ॲप स्टोअरचे विजेते ॲप होते. आता गुगल प्ले पुरस्कार पाहू.

हेही वाचा : मारुतीची ‘ही’ लोकप्रिय कार येणार नव्या रूपात! पाहा कोणते होणार महत्त्वपूर्ण बदल….

गुगल प्ले पुरस्कार विजेते

होनकाई : स्टार रेलने [Honkai: Star Rail] इथेदेखील सर्वोत्कृष्ट गेम म्हणून विजेतेपद पटकावले आहे. ॲपेक्स लिजंड मोबाइल, [Apex Legends Mobile] या बॅटल रॉयल गेम मोबाइल व्हर्जनला, गुगल प्लेचा युजर्स चॉईस हा पुरस्कार मिळाला असून, फारलाईट ८४ फास्ट [Farlight 84] पेस्ड ॲक्शन शूटर गेमने गुगल प्लेचा स्टॅन्ड आउट हा पुरस्कार मिळवला आहे. तर व्हॅम्पायर सर्व्हाइवर [Vampire Survivors] या शूटर गेमला गुगल प्ले इंडी गेम ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला आहे.

सर्वोत्कृष्ट फन ॲपसाठी, बंबल फॉर फ्रेंड्स: मीट IRL [Bumble For Friends: Meet IRL] या ॲपची निवड करण्यात आली आहे. रिस्ली रील मेकर व्हिडीओ एडिटर [Reelsy Reel Maker Video Editor] ॲपचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्या गेलेल्या, व्हॉईडपेट गार्डन [Voidpet Garden] या ॲपला ‘बेस्ट फॉर ग्रोथ’ या विभागात सन्मानित करण्यात आले असून, इंप्रिंट : लर्न व्हिज्युअली [Imprint: Learn Visually] या ॲपचादेखील विशेष उल्लेख केला गेला.

‘बेस्ट फॉर फॅमिली’ या विभागामध्ये, पॉ पेट्रोल [Paw Patrol] या आकर्षक आणि शैक्षणिक अनुभव देणाऱ्या ॲपचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच लेगो ड्युपलो डिस्नेचे [LEGO DUPLO DISNEY] देखील सहकुटुंब वापरू शकणाऱ्या ॲपसाठी विशेष उल्लेख केला गेला. ‘बेस्ट ॲप फॉर गुड’ या विभागामध्ये एवर्ल्ड[AWorld] या ॲपचा समावेश करण्यात आला आहे. व्हाॅट्सॲप मेसेंजर [WhatsApp Messenger] या ॲपला ‘बेस्ट फॉर वॉचेस’ म्हणून नावाजले गेले आहे. चित्रकला, नोट लिहिणे आणि स्केचिंग या विविध माध्यमांसाठी, ‘बेस्ट फॉर टॅबलेट्स’ या विभागात कॅनोवा आणि एव्हरअँड [Canva and Everand] या दोन ॲप्सचा विशेष उल्लेख केला आहे, ‘बेस्ट क्रोम बुक्स’ या विभागात ॲनिमेशन तयार करणाऱ्या फ्लीपाक्लिप [FlipaClip] या ॲपला पुरस्कार देण्यात आला असून, एव्हरनोट आणि व्हिडीओ [Evernote and Wideo] यांचा विशेष उल्लेख ऑर्गनायझेशनल आणि क्रिएटिव्ह ॲप म्हणून केला गेला आहे.

या सर्व पुरस्कारांमध्ये, सध्याचे सर्वात प्रगत AI तंत्रज्ञान आणि बहुचर्चित चॅट जीपीटीला [ChatGPT] मात्र कुठेही ॲपल आणि गुगल या दोन्हीही विभागांमध्ये स्थान मिळवता आले नाहीये. मात्र, विविध भाषांसाठी वापरल्या जाणाऱ्या चॅट बॉट हे चॅट जीपीटी मॉडेला युजर्स चॉईस ॲप बाय गुगल हा पुरस्कार देण्यात आला.