Best Laptops under 25000: आज ऑफिसच्या कामापासून ते कॉलेजच्या प्रोजेक्टपर्यंत अनेक कामे लॅपटॉपच्या मदतीने पूर्ण होतात. जी कामे स्मार्टफोनवर होऊ शकत नाही, अशा वेळेस लॅपटॉपची मदत घ्यावी लागते. अनेक लाख रुपयांपर्यंतचे लॅपटॉप बाजारात उपलब्ध आहेत. पण आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला अशा ४ लॅपटॉपबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला मिड रेंज सेगमेंटच्या मोबाईल फोनच्या किंमतीत मिळतील. खास गोष्ट म्हणजे, या लॅपटॉप्समध्ये तुम्हाला चांगला बॅटरी बॅकअप, उत्तम डिझाइन, उत्तम डिस्प्ले आणि दमदार परफॉर्मन्स मिळतो. हे लॅपटॉप खरेदी केल्यानंतर तुमचे काम खूप सोपे होईल. चला तर मग या लॅपटॉप्सच्या किंमती आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

अवघ्या २५ हजारांच्या बजेटमधील ‘हे’ आहेत बेस्ट लॅपटॉप्स

ASUS VivoBook 14 (2021)

ASUS VivoBook 14 मध्ये, तुम्हाला ४GB RAM आणि २५६GB SSD चा सपोर्ट मिळतो. लॅपटॉपमध्ये तुम्हाला १४-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या लॅपटॉपमध्ये सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये तुम्ही शाळेचे कोणतेही काम किंवा प्रकल्प सहज करू शकता. ऑफिसच्या कामासाठीही हा लॅपटॉप उत्तम आहे. ASUS VivoBook 14 लॅपटॉपची किंमत २१,९९० रुपये आहे. तुम्हाला लॅपटॉपवर ICICI बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरही सूट दिली जात आहे.

Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच

(हे ही वाचा : खुशखबर! नुकताच लाँच झालेला Google Pixel 7 खरेदी करा स्वस्तात, पाहा कुठे मिळतेय शानदार डील )

Primebook 4G

शार्क टँकमध्ये प्राइमबुक 4जी लॅपटॉप सादर करण्यात आला, त्यानंतर तो खूप चर्चेत आला. सामान्यत: तुम्ही लॅपटॉपमध्ये विंडो ऑपरेटिंग सिस्टम पाहिली असेल पण प्राइमबुक ४G हा Android आधारित लॅपटॉप आहे ज्यामध्ये तुम्हाला ४GB रॅम आणि ६४GB स्टोरेज क्षमता मिळते. हा लॅपटॉप MediaTek MT८७८८ प्रोसेसरवर काम करतो. लॅपटॉपची किंमत १६,९९० रुपये आहे. तुम्ही ते ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला १,२५० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

Lenovo E41-55 

या लेनोवो लॅपटॉपमध्ये तुम्हाला ४GB रॅम आणि २५६GB SSD चा सपोर्ट मिळतो. लॅपटॉप १४-इंच स्क्रीनसह येतो, ज्यामध्ये तुम्हाला ६ तासांपर्यंत बॅटरी बॅकअप मिळतो. हा लॅपटॉप तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून २४,००० रुपयांना खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला AMD Athlon A3150U प्रोसेसर आणि फ्रंट कॅमेरा मिळत आहे.

(हे ही वाचा : उगाच का Apple कंपनी एवढी मोठी झालीय? सकाळी उठल्यावर CEO करतात ‘हे’ महत्त्वाचं काम, वाचून प्रेमात पडाल )

HP Chromebook 11a

त्याचप्रमाणे, HP Chromebook 11a मध्ये देखील तुम्हाला ४GB RAM आणि ६४GB SSD चा सपोर्ट मिळतो. लॅपटॉप ११.६ इंच स्क्रीनसह येतो ज्यामध्ये तुम्हाला MediaTek MT8183 प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. हा लॅपटॉप तुम्ही Amazon वरून २२,४९० रुपयांना खरेदी करू शकता.

या सर्व लॅपटॉपमध्ये तुम्ही शाळेचे प्रोजेक्ट, एमएस वर्डशी संबंधित कोणतेही काम, इंटरनेट सर्फिंग, बेसिक एडिटिंग इत्यादी सहज करू शकता. एकूणच, हे लॅपटॉप अभ्यास आणि मूलभूत कामासाठी सर्वोत्तम आहेत. तुम्हाला प्रोफेशनल किंवा ग्राफिक्सशी संबंधित तपशीलवार काम करायचे असेल, तर तुम्हाला अधिक बजेटचा लॅपटॉप निवडावा लागेल.

Story img Loader