New Year Long Term Plans : रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलने काही दीर्घकाळ चालणारे प्लान्स लाँच केले आहेत. दर महिन्याला रिचार्ज करण्याचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्हाला हे प्लान्स फायदेशीर ठरू शकतात. तसेच प्रवासात असलेल्यांसाठीही हे प्लान्स उपयुक्त ठरू शकतात. कोणते आहेत हे प्लान्स? जाणून घेऊया.
१) रिलायन्स जिओ
रियान्स जिओ तीन दीर्घकालीन प्लान ऑफर करत आहे. २०२३ रुपयांचा प्लान हा यादीत सर्वात स्वस्त प्लान आहे. या प्लामध्ये २५२ दिवासांची व्हॅलिडिटी आणि दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि रोज १०० एसएमएसदेखील मिळतात.
(३१ मार्च २०२३ पूर्वीच आधारशी जोडा PAN, अन्यथा होईल निष्क्रिय, फॉलो करा ‘या’ स्टेप्स)
२५४५ रुपयांचा प्लान देखील उपलब्ध आहे. यामध्ये युजरला ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी, अमर्यादित व्हॉइस कॉल्स, रोज १०० एसएमएस, रोज १.५ जीबी हाय स्पिड डेटा मिळतो.
तुम्हाला वर्षभराचा प्लान हवा असल्यास तुम्ही २ हजार ८७९ रुपयांचा प्लान वापरू शकता. या प्लानची व्हॅलिडिटी ३६५ दिवस असून यात रोज २ जीबी डेटा मिळतो. युजरला अमर्यादित व्हॉइस कॉल्स आणि रोज १०० एसएमएस मिळतात.
तुम्ही २९९९ रुपयांचा प्लानदेखील वापरू शकता. या प्लानची व्हॅलिडिटी ३६५ दिवसून असून त्यात रोज २.५ जीबी डेटा मिळतो. युजरला अमर्यादित व्हॉइस कॉल्स आणि रोज १०० एसएमएस मिळतात. जिओ न्यू इअर ऑफर अंतर्गत युजरला २३ दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडिटी आणि ७५ जीबी हाय स्पीड इंटरनेट डेटाही मिळतो.
वर उल्लेख केलेल्या सर्वा प्लान्समध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड आणि जिओ सिक्युरिटी मोफत वापरता येते.
२) व्होडाफोन आयडिया
१४४९ रुपयांच्या प्लानमध्ये १८० दिवसांची व्हॅलिडिटी आणि दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल्स आणि रोज १०० एसएमएस मिळतात. या प्लानवर अॅप एक्सक्लुझिव्ह ऑफर असून त्यातून ५० जीबी अतिरिक्त डेटा मोफत मिळतो.
(इन्स्टाग्रामवर चुकून डिलीट झाले Photo, Video; ‘असे’ मिळवा परत)
ज्या युजर्सना अधिक डेटा नको आहे, मात्र मोठी व्हॅलिडिटी आणि अमर्यादित कॉलिंग हवी असल्यास १७९९ रुपयांचा प्लान उत्तम राहील. या प्लानची व्हॅलिडिटी ३६५ दिवस आहे, त्यात २४ जीबी डेटा आणि ३ हजार ६०० एसएमएस मिळतात.
२८९९ रुपयांच्या प्लानमध्ये ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते आणि त्यात अमर्यादित व्हॉइस कॉल्स, रोज १०० एसएमएस आणि अमर्यादित डेली डेटा युसेजसह ८५० जीबी डेटा मिळतो.
३०९९ हा व्होडाफोनचा सर्वात महागडा प्लान आहे. या प्लानची व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची असून त्यात अमर्यादित कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि २ जीबी डेटा रोज मिळतो. तुम्ही एक वर्ष डिजनी प्लस हॉटस्टार पाहू शकता आणि दर महिन्याला तुम्हाला २ जीबी बॅकअप डेटा मिळतो.
१७९९ सोडून सर्व लाँग टर्म प्लान्समध्ये विकेंड डेटा रोलओव्हर, व्हीआय मुव्हीज आणि टीव्ही अॅक्सेस आणि मध्यरात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत अमर्यादित डेटा वापरता येतो.
३) एअरटेल
एअरटेलमध्येही काही चांगले दीर्घकालीन प्लान्स उपलब्ध आहेत. १७९९ हा सर्वात स्वस्त प्लान असून त्यात २४ जीबी डेटा आणि ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. युजरला ३६०० एसएमएस आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगही मिळते.
२९९९ रुपयांच्या प्लानमध्ये २६५ दिवसांची व्हॅलिडिटीसह अमर्यादित कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि रोज २.५ जीबी डेटा मिळतो. ३३५९ हा एअरटेलचा सर्वात महागडा प्लान आहे. यामध्ये 365 दिवसांची व्हॅलिडिटीसह रोज २.५ जीबी डेटा, रोज १०० एसएमएस आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग मिळते. युजरला एक वर्षांपर्यंत प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन आणि एक वर्षांपर्यंतचे डिजनी प्लस हॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शनही मिळते.
वर उल्लेख केलेल्या एअरटेलच्या सर्वा प्लान्समध्ये विंक म्युझिक, हेलो ट्युन्स आणि अपोलो २४/7 सर्कलचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.