कॉम्प्युटर असो स्मार्टफोन असो अथवा लॅपटॉप कोणत्याही डिव्हाइसवर काम करताना काही शॉर्टकट्स कीज माहिती असणे गरजेचे आहे. शॉर्टकट्स कीज माहिती असल्यावर या डिव्हाइसच्या माध्यमातून काम लवकर करता येते व वेळेची देखील बचत होते. ऑफिसपासून ते कॉलेजच्या प्रोजक्ट्साठी आता लॅपटॉप देखील खूपच कामाचे डिव्हाइस झाले आहे. त्यामुळे लॅपटॉपवर काम करताना काही शॉर्टकट्स कीज माहिती असणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या मदतीने तुमचे काम सोपे आणि जलद होते. आज तुमच्या मदतीसाठी आम्ही कॉम्प्युटरच्या अशाच काही शॉर्टकट कीजची माहिती घेऊन आलो आहोत ज्या खूप उपयोगी ठरतील. काही खास शॉर्टकट की आणि त्यांच्या वापराविषयी सविस्तर जाणून घेऊया.

तुम्ही या शॉर्टकट की देखील लक्षात ठेवा

Ctrl + Z

कॉम्प्युटरवर काम करताना चुकून एखादी गोष्ट डिलीट झाली असेल, तर तुम्ही Ctrl + Z च्या मदतीने पुन्हा करू शकता.

77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात

Window+L

जागेवरून उठताना तुमच्या कॉम्प्युटरवरील काम कोणी पाहू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तो लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला Window + L चा वापर करावा लागेल.

Ctrl+F

तुम्हाला वेब पेजवर विशिष्ट शब्द शोधायचा असल्यास, स्क्रोल करण्याऐवजी Ctrl+F वापरा. यानंतर एक पिवळा बॉक्स उघडेल, जिथे तुम्ही तो शब्द टाइप करून शोधू शकता.

Shift+Insert

तुम्हाला माहित असेलच की Ctrl + V चा वापर कोणताही मजकूर पेस्ट करण्यासाठी केला जातो, परंतु तुम्हाला माहित आहे का की Shift + Insert वापरून तुम्ही कोणताही मजकूर कुठेही पेस्ट करू शकता.

Esc key

जर तुम्ही चुकून अशा पृष्ठावर पोहोचलात जेथे मागील बटण उपस्थित नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. त्याऐवजी तुम्ही Esc की वापरून ते पेज बंद करू शकता.

Alt+F4

कॉम्प्युटर स्क्रीनवर उघडलेला कोणताही प्रोग्राम बंद करण्यासाठी Alt+F4 या शॉर्टकट कीचा वापर करता येतो.

Ctrl+End

वेबपेजच्या शेवटी स्क्रोल करण्यात वेळ वाया घालवू नका, उलट तुम्ही Ctrl+End शॉर्टकट कीच्या मदतीने थेट वेबपेजच्या शेवटी पोहोचू शकता.

Window + D

कॉम्प्युटरच्या वेबपेजवर अनेक पेज ओपन असतात. त्यानंतर थेट डेस्कटॉपवर जाण्यासाठी तुम्हाला मोठी प्रक्रिया फॉलो करण्याची आवश्यकता नाही, परंतु यासाठी फक्त Window + D ही शॉर्टकट की वापरा.

Ctrl+S

जर तुम्हाला कोणतीही फाईल कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करायची असेल, तर त्यासाठी पेजवरील Home वर क्लिक केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. परंतु एवढी मोठी प्रक्रिया आणि वेळ वाचवण्यासाठी तुम्ही Ctrl+S वापरून फाईल सेव्ह करण्याचा पर्याय उघडला जाईल.

Story img Loader