सध्या भारतात काही वर्षांपासून स्मार्टफोनचे मार्केट खूप वाढले आहे. अनेक कंपन्या आपले नवनवीन स्मार्टफोन्सचे मॉडेल्स लाँच करत असतात. आजकाल स्मार्टफोन काळाची गरज बनली आहे. आपले काम पूर्णपणे स्मार्टफोनवर अवलंबून असते. काही अधिक फीचर्स असणारे स्मार्टफोन्स महागडे असतात त्यामुळे आपण ते खरेदी करू शकत नाही किंवा आपल्याला शक्य होत नाही. मात्र आज आपण बेस्ट फीचर्स असणारे स्मार्टफोन जे फक्त ८,००० रुपयांच्या आत तुम्ही खरेदी करू शकता हे जाणून घेऊयात.
Moto E13
Moto E13 हा स्मार्टफोन तुम्ही फ्लिपकार्ट या वेबसाइटवरून खरेदी करू शकता. यामध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज वापरकर्त्यांना वापरायला मिळते. यामध्ये Unisoc T606 हा प्रोसेसर असून याच्या डिस्प्लेमध्ये ६.५ इंचाची एचडी स्क्रीन मिळते. ५००० mAh बॅटरी व १० वॅटचे फास्ट चार्जिंग सपोर्ट या फोनमध्ये येतो. Moto E13 या स्मार्टफोनची किंमत ७,९९९ रुपये इतकी आहे.
Samsung Galaxy A03
जर तुम्ही Samsung सारख्या ब्रँड चा फोन तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू इच्छित असा तर Galaxy A03 हा स्मार्टफोनचं तुम्ही विचार करा. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या या फोनमध्ये Unisoc Tiger T606 हा प्रोसेसर येतो. यामध्ये वापरकर्त्यांना ६.५ इंचाची स्क्रीन मिळते. ५०००mAh इतकी बॅटरी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यामध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा येतो. सॅमसंग च्या या फोनची किंमत ७,९५० रुपये इतकी आहे.
Tecno Spark Go 2023
Techno Spark Go 2023 या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ६.५६ इंचाचा एचडी + डॉट नॉच आयपीएस डिस्प्ले मिळतो. यामध्ये ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा येतो. तर १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा मिळतो. यामध्ये ३ जीबी रॅम व ३२ आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज असे पर्याय उपलब्ध असून तुम्ही हा फोन ६,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. या फोनमध्ये ५०००mAh बॅटरी आणि या फोनमध्ये MediaTek Helio A22 प्रोसेसर देण्यात आला आहे.
हेही वाचा : Tech Layoff मध्ये TCS च्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नोकरी तर जाणार नाहीच पण…
Redmi 10A
Redmi 10A हा स्मार्टफोन Croma वरून तुम्ही खरेदी करू शकता. ८००० च्या आतमधील स्मार्टफोन्समध्ये हा सर्वोत्तम स्मार्टफोन्सपैकी एक आहे. यामध्ये MediaTek Helio G25 हा प्रोसेसर , ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज वापरकर्त्यांना मिळते. हा स्मार्टफोन ४जी नेटवर्कला सपोर्ट करतो. यामध्ये मल्टी कॅमेरा सिस्टीम, फिंगरप्रिंट सेन्सर असे फिचर येतात. तर ५००० mAh बॅटरी येते. एकदा हा स्मार्टफोन चार्ज केला की , बॅटरी दोन दिवस आरामात टिकू शकते असा कंपनीचा दावा आहे. वापरकर्ते हा फोन ७,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. Redmi 10A या फोनची बॉडी प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आली आहे. तसेच ६.५३ इंचाचा डिस्प्ले , मायक्रोएसडी कार्डचा सपोर्ट आणि ३.५ मामीचा ऑडिओ जॅक देखील या डिव्हाइसमध्ये बघायला मिळतो.
Realme Narzo 50i Prime
Realme Narzo 50i हा स्मार्टफोन तुम्ही ७,९९९ रुपयांना खरेदी करू शकणार आहात. यामध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. या डिव्हाइसमध्ये Unisoc T612 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये ८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा येतो. ६.५ इंचाचा डिस्प्ले वापरकर्त्यांना वापरायला मिळणार आहे.