सध्या भारतात काही वर्षांपासून स्मार्टफोनचे मार्केट खूप वाढले आहे. अनेक कंपन्या आपले नवनवीन स्मार्टफोन्सचे मॉडेल्स लाँच करत असतात. आजकाल स्मार्टफोन काळाची गरज बनली आहे. आपले काम पूर्णपणे स्मार्टफोनवर अवलंबून असते. काही अधिक फीचर्स असणारे स्मार्टफोन्स महागडे असतात त्यामुळे आपण ते खरेदी करू शकत नाही किंवा आपल्याला शक्य होत नाही. मात्र आज आपण बेस्ट फीचर्स असणारे स्मार्टफोन जे फक्त २५,००० रुपयांच्या आतमध्ये तुम्ही खरेदी करू शकणार आहात.
मार्च २०२३ मध्ये अनेक स्मार्टफोन्स लॉन्च झाले आहेत. Poco, Realme, Redmi , OnePlus अशा अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन आहे ज्यामध्ये बेस्ट फीचर्स तुम्हाला मिळतात. तसेच ते तुमच्या बजेटमध्ये देखील आहेत. फीचर्समध्ये बॅटरी, कॅमेरा आणि स्टोरेज तसेच सेटफी फीचर्स यांचा समावेश होतो. आज पण २५,००० रुपयांच्या आतले बेस्ट स्मार्टफोन्स कोणकोणते आहेत ते जाणून घेऊयात.
Poco X5 Pro 5G
Poco X5 Pro ला Redmi Note 12 Pro+ प्रमाणेच फीचर्स असण्याची शक्यता आहे. ६.६७ इंचाचा AMOLED डिस्प्ले यामध्ये असू शकतो. या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा , १०८ मेगापिक्सल रियर कॅमेरा असू शकतो. हँडसेटमध्ये Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर दिला जाईल. तसेच ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज कंपनीकडून वापरकर्त्यांना दिले जाऊ शकते. या डिव्हाइसमध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी वाव ६७ वॅटचे चार्जिंग सपोर्ट मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच फोनमध्ये IR ब्लास्टर आणि ड्युअल स्टीरिओ स्पीकर मिळण्याची अपेक्षा आहे. या फोनची किंमत ही २२,९९९ रुपये इतकी आहे.
Realme 10 Pro 5G
Realme 10 Pro 5G स्मार्टफोनमध्ये ६.७ इंच फूल एचडी + डिस्प्ले, अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित रिअल मी यूआय ४.०, स्नॅपड्रॅगन ६९५ ५जी एसओसी, अड्रिनो ए६१९ जीपीयू, ८ जीबी रॅम, १०८ एमपी प्रायमरी कॅमेरा, सेल्फीसाठी १६ एमपी कॅमेरा, ५ हजार मेगाहर्ट्झची बॅटरी, ३३ वॉट सुपर व्हीओओसी फास्ट चार्जिंग मिळते. फोन २० मिनिटांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे. Realme 10 Pro 5G स्मार्टफोनबाबत बोलायचे झाल्यास ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंट असणाऱ्या फोनची किंमत १८ हजार ९९९ रुपये, तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंट १९ हजार ९९९ रुपयांमध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे.
Redmi Note 12 5G
Redmi Note 12 5G हा स्मार्टफोन तुम्हाला रिटेल आणि ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात खरेही करता येणार आहे . या स्मार्टफोनची किंमत १७,९९९ पासून सुरु होते. यामध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज येते. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत १९,९९९ इतकी आहे. रेडमी नोट १२ ५जी सिरीजमधील व्हॅनिला मॉडेलमध्ये पंच-होल(punch-hole) डिस्प्ले आहे तो प्लास्टिक बिल्ड आहे. या स्मार्टफोनला आयपी५३(IP53) रेटिंग आहे. रेडमी नोट १२ ५जी या स्मार्टफोनमध्ये सैद माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर , आयआर ब्लास्टर आणि ३.५ मिमी इंचाचे हेडफोनचे जॅक आहे.
या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी + AMOLED डिस्प्ले आहे. तसेच १०८०x२४०० पिक्सल रिझोल्युशन आणि १२० Hz असा रिफ्रेश रेट मिळतो. रेडमी नोट १२ ५जी या स्मार्टफोनमध्ये ५०० mAh क्षमतेची बॅटरी असणार आहे. आणि ३३ वॅटचा चार्जर यामध्ये येतो. या फोनचा कॅमेरा हा ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. यामध्ये ४८ मेगापिक्सलचा बेसिक कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो शूटरचा समावेश आहे. याचा सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे. वापरकर्त्यांना रेडमीच्या या फोनमध्ये वरील फीचर्स बघायला मिळतील.
हेही वाचा : प्रतीक्षा संपली! भारतात आजपासून Redmi Note 12 5G ची विक्री सुरु; जाणून घ्या खासियत
OnePlus Nord CE 2 5G
वनप्लस नॉर्ड सीई २ ५जीमध्ये ६.४३ इंच फुलएचडी + एमोलेड डिस्प्ले आहे. स्क्रीनचा रिफ्रेश दर ९०Hz आहे. स्क्रीनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ५ देण्यात आला आहे. स्क्रीन HDR10+ ला सपोर्ट करते. फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी ९०० प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर ५ जी सपोर्टसह येतो. वनप्लस नॉर्ड सीई २ ५जीमध्ये ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅमसह १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज पर्याय आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 65W SUPERVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.