सध्या देशामध्ये अनेक कंपन्या आपले नवनवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत आहेत. यापुढेही अनेक कंपनी आपले फोन भारतीय बाजारपेठेमध्ये सादर करणार आहेत. प्रत्येक जण नवीन फोन खरेदी करत असताना त्यामधील फीचर्स, कॅमेरा , बॅटरी आणि स्पेसिफिकेशन्स व किंमत याची सर्व चौकशी करूनच खरेदी करत असतो.
आपल्याला कोणत्या कामासाठी फोन हवा आहे त्यानुसार आपण फोन खरेदी करतो. आज बाजारामध्ये वनप्लस, iQOO , विवो कंपन्यांचे असे अनेक स्मार्टफोन्स आहेत. ज्यात ग्राहकांना आवश्यक असलेले फिचर आणि अन्य गोष्टी मिळू शकतात. या प्रीमियम फोन्समध्ये हाय क्वालिटी कॅमेरे, बॅटरी आणि स्टोरेज असे अनेक फायदे खरेदीदारांना मिळतात. आज आपण ४० हजार रुपयांच्या आतमधील असे काही स्मार्टफोन्स पाहणार आहोत ज्यात चांगले फीचर्स, स्पेसिफिकेशन्स मिळतील.
OnePlus Nord 3 5G
OnePlus Nord 3 5G हा एक आकर्षक डिझाईन असलेला स्मार्टफोन आहे. यामध्ये AMOLED फ्लॅट डिस्प्ले मिळतो. तसेच रिअर कॅमेरा सेटअपमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च झाला आहे. १६ जीबी रॅम देणारे नॉर्ड मधील हा पहिला स्मार्टफोन आहे. याची किंमत ४० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. तसेच यामध्ये मिळणारे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स ग्राहकांना फायदेशीर ठरू शकतात.
iQOO Neo 7 Pro 5G
iQOO Neo 7 Pro मध्ये वापरकर्त्यांना ६.७८ इंचाचा AMOLED फ्लॅट डिस्प्ले मिळणार आहे. ज्याला १२० Hz चा रिफ्रेश रेट मिळेल. या डिस्प्लेमध्ये फुल एचडी + रिझोल्युशन ऑफर करते. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटला सपोर्ट करतो. यामध्ये फोनमध्ये कंपनीने वापरकर्त्यांना १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज ऑफर केले आहे. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित FuntouchOS 13 वर चालतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.
या फोनचा कॅमेरा हे प्रमुख आकर्षण असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्स, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे. iQOO Neo 7 Pro 5G हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यातील ८जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३४,९९९ रुपयांमध्ये करण्यात आली आहे. तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत ३७,९९९ रुपये इतकी आहे. ग्राहक हा फोन Fearless Flame (ऑरेंज) आणि Dark Storm (निळा) या रंगांमध्ये खरेदी करू शकतात. तसेच या फोनची विक्री १५ जुलैपासून Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच तो कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर देखील उपलब्ध असेल.
OnePlus 11R 5G
या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा इंचाचा एफएचडी+ डिस्प्ले येतो. हे डिव्हाईस स्नॅपड्रॅगन 8+ जनरल 1 प्रोसेसरद्वारे संलग्न आहे. यात १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेज येते. या स्मार्टफोनचा कॅमेरा ५० प्लस १२प्लस २ मेगापिक्सलचा कॅमेरा येतो. ट्रिपल रियर कॅमेरा येतो. तसेच सेल्फी कॅमेरा १६ मेगापिक्सलचा कॅमेरा येतो. तसेच या डिव्हाइसमध्ये १०० वॅटचे चार्जिंग सपोर्ट येतो. या स्मार्टफोनच्या बॅटरीची क्षमता ५,००० mAh इतकी आहे. OnePlus 11R च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ही ३९,९९९ रुपये इतकी आहे.
Vivo V27 Pro 5G
Vivo v२७ pro या फोनमध्ये तुम्हाला ६.७ इंचाचा हाय रिझोल्युशन डिस्प्ले मिळणार आहे. तसेच या फोनमध्ये MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर मिळणार आहे. तर दुसरीकडे vivo v २७ या फोनमध्ये तुम्हाला MediaTek Dimensity 7200 हा प्रोसेसर मिळणार आहे. Vivo V27 pro या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा , ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा सेटअप मिळणार आहे. वापरकर्त्यांना यामध्ये सेल्फी व व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी ५० मेगापिक्सलचा इतका कॅमेरा मिळणार आहे. vivo च्या या स्मार्टफोन्समध्ये ग्राहकांना लग्नासाठी वेडिंग स्टाईल पोर्ट्रेट कॅमेरा फिल्टर्स मिळणार आहेत. यासह नाईट फोटोग्राफीसाठी ऑरा लाईट सपोर्ट उपलब्ध असणार आहे. ज्यामुळे तुम्ही फ्लॅशलाईटच्या मदतीने रात्रीही चांगले फोटो काढू शकता. Vivo V27 Pro हा फोन लॉन्च केला असून , ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत ही ३९,९९९ रुपये इतकी आहे.