भारतातील स्मार्टफोन मार्केट खूपच मोठे आहे. दर आठवड्याला नवनवीन स्मार्टफोन्स लाँच होण्याची रांग लागलेली असते. अगदी १० हजार रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंत अनेक शानदार स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे फोन बाजारात उपलब्ध असल्याने खरेदी करताना गोंधळ निर्माण होतो. तुम्ही देखील नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर १० हजारांच्या बजेटमध्ये काही चांगले फोन्स उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला या बजेटमध्ये येणाऱ्या काही चांगल्या हँडसेट्सची माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला फोन खरेदी करताना मदत होईल. १० हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही स्मार्टफोन्स खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला ५ बेस्ट स्मार्ट फोन्स दाखवणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Realme Narzo N53 चे फीचर्स

Realme Narzo N53 मध्ये तुम्हाला ६.७४ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा ९० Hz इतका आहे. ब्राईटनेस ४५० नीट्स इतका आहे. हा स्मार्टफोन Octa Core Unisoc T612 SoC वर काम करतो. या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळते. या फोनला ६ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळतो. रिअलमीचा हा स्मार्टफोन अँड्रॉइड १३ वर आधारित Realme UI 4.0 काम करतो. रिअलमीच्या या फोनमध्ये वापरकर्त्यांना ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. ज्याला AI चा सपोर्ट देखील मिळतो.

रेडमी ए2

रेडमी ए2 स्मार्टफोन भारतात तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. ह्याच्या बेस मॉडेलमध्ये २जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत ५,९९९ रुपये आहे. तर २जीबी रॅम + ६४जीबी मेमरी व्हेरिएंटची किंमत ६,४९९ रुपये तर ४जीबी रॅम + ६४जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७,४९९ रुपये आहे.

पोको C51

५००० mAh ची बॅटरी असलेला हा पोको फोन बजेट सेगमेंटमध्ये आला आहे. कंपनीनं यात MediaTek Helio G36 चिपसेटची पावर दिली आहे. हा फोन ४ GB RAM आणि ६४GB Storage ला सपोर्ट करतो. कंपनीनं ६.५२ इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देखील दिला आहे. फोनच्या मागे ८ MP + 0.08 MP चा कॅमेरा सेटअप आहे. तर फ्रंटला ५ MP चा सेन्सर मिळतो.

मोटो G13

Moto G13 हा 4G स्मार्टफोन आहे, जो Android 13 वर काम करेल. मोबाईल फोनमध्ये ४GB रॅम आणि १२८GB इंटरनल स्टोरेज आहे. हा MediaTek Helio G85 प्रोसेसरसह येतो आणि ६.५-इंचाचा HD Plus डिस्प्ले आहे. १० W फास्ट चार्जिंगसह स्मार्टफोनमध्ये ५००० mAh बॅटरी उपलब्ध आहे. फोटोग्राफीच्या बाबतीत, यात ५०-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि दोन २-मेगापिक्सेल कॅमेरासह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.

हेही वाचा – Smartphone cover: बॅक कव्हरमुळे हँग होतोय तुमचा मोबाईल, जाणून घ्या फोन गरम होण्यामागचं कारण

सॅमसंग Galaxy M04

सॅमसंगचा हा फोन MediaTek Helio P35 प्रोसेसरला सपोर्ट करतो. कंपनीनं ४ GB RAM ची ताकद ह्यात दिली आहे, जोडीला ६४GB Storage देखील मिळते. ह्यातील ६.५ इंचाचा पीएलएस एलसीडी डिस्प्ले एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. फोनच्या मागे १३ MP + 2 MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, तर फ्रंटला ५ MP चा सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील ५००० mAh ची बॅटरी यूएसबी टाइप सी पोर्टनं चार्ज करता येते.