तुम्हाला तुमच्या Google Chrome ब्राउझरवर अपडेट्स डाउनलोड करण्यासाठी नोटिफिकेशन देखील मिळतात का? जर होय, तर ते पेज त्वरित बंद करा आणि चुकूनही डाउनलोड बटणावर क्लिक करणं टाळा. कारण हल्ली नवीन रॅन्समवेअर (एक प्रकारचा मालवेअर) दुर्भावनायुक्त वेबसाइट्सद्वारे वेगाने पसरत आहे. हा तुमच्या पर्सनल कम्प्यूटरवर सर्व डेटाला असं बनवतात की ते तुमच्यासाठी काहीच उपयोगाचे होत नाहीत. खंडणी भरल्यानंतर म्हणजेच समोरून मागणी केलेली रक्कम भरल्यानंतरच तुम्ही तुमचा डेटा परत मिळवू शकता. सध्या ही समस्या मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझरवर आहे.
GBHackers.com च्या रिपोर्टनुसार, Magniber Ransomware पुन्हा परत आले आहे. पूर्वी ते इंटरनेट एक्सप्लोरर ब्राउझरच्या माध्यमातून निष्पाप लोकांना आपली शिकार बनवायचे. अटॅकर्स आता यासाठी मायक्रोसॉफ्ट एज आणि गुगल क्रोम वापरत आहेत. हे रॅन्समवेअर पूर्वीप्रमाणेच कार्य करते.
मिळालेल्या माहितीनुसार, हा मालवेअर क्रोम किंवा एज ब्राउझरच्या नवीन अपडेटच्या नावाने फेज (फेक) वेब पेजेसद्वारे पाठवला जातो. युजर्सने “अपडेट क्रोम” किंवा “अपडेट एज” बटणावर क्लिक केल्यास, पेज .appx प्रकाराचा ब्राउझर एक्सटेंशन डाउनलोड करेल. ते इन्स्टॉल केल्यानंतर, प्रोग्राम बॅकग्राउंडमध्ये चालू होतो.
आणखी वाचा : Amazon वर सुरू होतोय Great Republic Day Sale! स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि इतर वस्तूंवर बंपर ऑफर
Malicious फाइल्स तुमच्या विंडोज स्क्रीनवर बॅकग्राउंडमध्ये एनक्रिप्ट होण्यास सुरुवात करतात, ज्या कोणत्याही युजर्सला माहीतही नसतात. हे एन्क्रिप्शन पूर्ण झाल्यावर, तुम्हाला नोटपॅडवर खंडणीची नोट मिळेल. जोपर्यंत तुम्ही खंडणीची रक्कम देत नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या संगणकावरील कोणत्याही फाइलमध्ये प्रवेश करता येणार नाही, असं म्हटलं जातं.
कसे टाळावे?: भविष्यात अशा प्रकारची रॅन्समवेअर टाळण्यासाठी आपण काही खबरदारी घेऊ शकता. उदाहरणार्थ, तुमच्या Chrome किंवा Edge ब्राउझरवर इतर किंवा अज्ञात वेबसाइटवरून “अपडेट पॅकेजेस” कधीही डाउनलोड करू नका. Chrome आणि Edge देखील सर्व्हरवरून आपोआप अपडेट होऊ शकतात. त्यामुळे मॅन्युअल अपडेट करण्याची गरज नाही.
आणखी वाचा : धुमाकूळ घालायला आलाय OPPO चा सर्वात स्लीम स्मार्टफोन, १० हजार रुपयांमध्ये मिळणार हे फीचर्स
टेक एक्सपर्टच्या मते, हॅकर्स सामान्यत: बनावट पेजेसद्वारे अपडेट्स डाउनलोड करण्याचा बहाणा करून सामान्य लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात. तसेच, तुमच्या डेटाचा बॅकअप क्लाउड स्टोअर किंवा फिजिकल एक्सटर्नल स्टोरेज बॅकअपमध्ये ठेवा. तुमचा पीसी इन्फेक्ट झाला असला तरीही तुम्ही तुमचा डेटा रिसेट करून सहजपणे रिस्टोअर करू शकता.