सध्या जगभरात सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आपण आपल्या जीवनात रोज कुठेना कुठे तरी सायबर क्राईमच्या बातम्या वाचतच असतो. मात्र याविरुद्ध जग आता एकत्रित आले असून, सायबर क्राईम विरुद्ध मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे. याच दृष्टीने आज (७ फेब्रुवारी ) सेफर इंटरनेट डे साजरा करण्यात येतो.

आता आजच्या काळामध्ये प्रत्येकजण व्हाट्सअ‍ॅपचा वापर करतो. हे एक सोशल मीडिया प्लाफॉर्म असून हे मेटाच्या मालकीचे आहे. यावरून एकमेकांशी संवाद साधता येतो. जर तुम्हाला सायबर क्राईम आणि फसवणूक याबद्दल फारशी माहिती नसेल तर आपण खालील माहिती नक्की वाचा.

Aai Kuthe Kay Karte
अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
digital arrest video real cop catches scammer cop video viral
स्कॅमरचा झाला गेम! नकली पोलीस बनून खऱ्या पोलीस अधिकाऱ्याला केला व्हिडीओ कॉल अन्… VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
WhatsApp Wedding Invitation Scam Scammers Are Using New Tricks To Steal Your Money
व्हॉट्सअ‍ॅपवर आलेली लग्नपत्रिका डाऊनलोड करताय? मग सावधान, अन्यथा तुमचा मोबाईल हॅक झालाच म्हणून समजा
Mother saved her daughter from an accident video went viral on social media
हे फक्त आईच करू शकते! चिमुकली रस्त्यावर पळत सुटली अन्…, पुढच्याच क्षणी आईने जे केलं ते पाहून मातृत्वाला कराल सलाम
bull Fight Viral Video | Bull Attack on boy Wearing Red Shirt
“शिंगांनी उडवलं अन् लाथांनी तुडवणार इतक्यात…”, पिसाळलेल्या बैलाचा व्यक्तीवर हल्ला; पाहा थरारक Video

व्हाट्सअ‍ॅपच वपर करत असताना एखाद्या अनोळखी नंबरवरून तुम्हाला लिंक आली आणि तुम्ही त्यावर जर क्लिक करून त्यावरील कोणत्याही ऑफरबाबत माहिती असेल तर तुम्ही सतर्क राहणे गरजेचे आहे. सायबर क्राईममध्ये तुम्हाला फसवण्यासाठी हा एखादा सापळासुद्धा असू शकतो.

हेही वाचा : Valentines Day 2023: मनपसंत साथीदाराच्या शोधात आहात? तर मग चर्चेत असणाऱ्या ‘या’ पाच डेटिंग अ‍ॅप्सबाबत जाणून घ्या

आपण एखाद्या नवीन ठिकाणी जात असतो तिथे आपली काही नवीन माणसांशी ओळख होते पण त्या ओळखीने आपले त्यांच्यासोबत व्हाट्सअ‍ॅपवर बोलणे सुरु होते. मात्र नवीन व्यक्तीशी बोलताना त्याने तुमची वैयक्तिक किंवा तुमच्या आर्थिक गोष्टींबद्दल विचारणा केल्यास त्याला काही न सांगण्याची सतर्कता तुम्ही बाळगणे आवश्यक आहे.

तर काही वेळा अनेक ठिकाणी जातो चौकशीसाठी किंवा माहिती घेण्यासाठी तेव्हा आपण आपला व्हाट्सअ‍ॅपचा मोबाईल नंबर तिथे देतो. त्यावेळी त्या व्हाट्सअ‍ॅप नंबरवर बँक , सरकारी किंवा खासगी कार्यालये यांच्या नावाने अज्ञात व्यक्ती देखील तुम्हाला संपर्क करत असतात. तो फोन उचलल्यास त्यावरून तुमचे खाते ब्लॉक करण्याची धमकी दिली जाते. यावरून जर बँकेने किंवा सरकारी कार्यालयाशी संबंधित माहिती कोणी व्हाट्सअ‍ॅपवर विचारली तर तुम्हाला कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करत आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे.

व्हाट्सअ‍ॅपने टू -स्टेप व्हेरिफिकेशन फिचर ऍक्टिव्ह करून वापरकर्त्यांना अतिरिक्त सुरक्षा ऑफर केली आहे. वापरकर्ते ज्या वेळेस त्याचे अकाउंट रिसेट करू इच्छितात आणी अकाउंटमधील मजकूर पाहण्यासाठी त्यांना सहा आकडी पिन टाकणे आवश्यक असते. स्मार्टफोन किंवा सिम कार्ड चोरीस गेल्यावर हेच फिचर फायदेशीर ठरते.

हेही वाचा : आता परदेशातदेखील करता येणार PhonePe वरून पेमेंट, जाणून घ्या कसे आहे नवीन फिचर

व्हाट्सअ‍ॅपवर तुम्ही जर एखाद्या सायबर क्राईम बळी झाला असाल किंवा से झाल्याचा तुम्हाला संशय आल्यास तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता. व्हाट्सअ‍ॅपवर वापरकर्त्यांना संबंधित चॅटला ब्लॉक करून तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

१. सर्वप्रथम आपले व्हाट्सअ‍ॅप ओपन करावे.
२. त्यानंतर उजव्या बाजूला असणाऱ्या तीन डॉट वॉर क्लिक करावे.
३. तीन डॉटवर क्लिक केल्यावर सेटिंगमध्ये जावे.
४. नंतर प्रायव्हसी ऑप्शनवर क्लिक करावे.
५. स्क्रोल केल्यावर ब्लॉक ऑप्शनवर जावे.
६. त्यानंतर जायचा नंबर ब्लॉक करायचा आहे ते सिलेक्ट करून प्लस आयकॉनवर क्लिक करावे.
७. इथे रिपोर्टचा देकील ऑप्शन असतो . ब्लॉक सोबतच वापरकर्ते रिपोर्ट करू शकतात.