व्हॉट्सॲप नेहमीच लोकांना खोट्या बातम्या आणि स्कॅमबद्दल सांगत असते. यासोबतच ते लोकांना जागरूकही करत असते. आता व्हॉट्सॲपवर एक नवीन मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोकांना पिंक व्हॉट्सॲप डाउनलोड करण्याची लिंक दिली जात आहे. स्कॅमर्स अनेक लोकांना ही लिंक पाठवत आहेत. असे बोलले जात आहे की, हे नवीन व्हॉट्सॲप नवीन लूकसह मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंक व्हॉट्सॲपबाबत व्हायरल होत असलेल्या मेसेजची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या मार्गदर्शक सुचनांमध्ये अधिकाऱ्यांनी लोकांना या नव्या स्कॅमबाबत सावध केले आहे. तसेच या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक न करण्याचा इशारा दिला आहे. चला जाणून घेऊया काय आहे पिंक व्हॉट्सॲप स्कॅम?

पिंक व्हाट्सएप स्कॅम काय आहे?

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सएपवर एक फेक मेसेज वायरल होत असल्याचा दावा केला आहे हा ॲपचा रंग बदलतो आहे. शिवाय, हे व्हाट्सएप एक्सपीरियंस देखील उत्तम करण्याचा दावा करतो. पोलीसांनी सावधानतेचा इशारा दिला आहे की, ही एक फिशिंग लिंक दिली आहे ज्यावर क्लिक करून ग्राहकांच्या डिव्हाइसवर हॅकर्स हल्ला करू शकतात. स्कॅमर्स डिव्हाइसचा रिमोट कंट्रोल मिळवू शकतात.

हेही वाचा – स्मार्टफोनमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स कसे ठेवावे? ‘या’ अ‍ॅपच्या मदतीने डाऊनलोड करू शकता सॉफ्ट कॉपी

हेही वाचा –वायरलेस चार्जरने कसा चार्ज होतो तुमचा फोन, कोणतीही वायर न जोडता आत कशी जाते वीज? जाणून घ्या

पिंक व्हाट्सएप स्कॅमपासून कसे सुरक्षित राहावे?

  • जर तुम्ही तुमच्या मोबाइलवर बनावट ॲप डाउनलोड केले असेल, तर ते लगेचच अनइंस्टॉल करा.
  • कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करु नये हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. लिंकवर तेव्हाच क्लिक करा जेव्हा तुम्हाला ती प्रमाणिकत माहित असेल.
  • ॲप डाउनलोड करण्यासाठी नेहमीच गूगल प्ले स्टोअर किंवा iOS ॲप स्टोअर वापरा.
  • ॲप्स नेहमी अप टू डेट ठेवा.
  • एकही लिंक किंवा मेसेजला विचार न करता कोणताही फॉरवर्ड करु नका.
  • तुमची खाजगी माहिती किंवा फायनाशिअल माहिती जसे लॉगिन क्रिडेंशिअल, पासवर्ड, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड डिटेल्स कोणाबरोबर शेअर करू नका.