BSNL 5G: सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) खासगी कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाला टक्कर देण्यासाठी आता सज्ज झाली आहे. बीएसएनएलला दूरसंचार विभागाकडून (DoT) ६२,००० कोटी रुपयांचे 5G स्पेक्ट्रम मिळणार आहे. हे या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने जाहीर केलेल्या १.६४ लाख कोटी रुपयांच्या मदत पॅकेजच्या व्यतिरिक्त असेल. याशिवाय, सरकार बीएसएनएलला ७०० मेगाहर्ट्झ आणि ३.३ गीगाहर्ट्झमध्ये एअरवेव्ह वाटप करण्याचा विचार करत आहे. BSNL 700 MHz बँडद्वारे 5G सेवा देणारी भारतातील दुसरी दूरसंचार ऑपरेटर बनेल. यापूर्वी ७०० मेगाहर्ट्झ बँड फक्त जिओकडे होता.
दूरसंचार विभागाची मान्यता
दूरसंचार विभागाच्या समितीने बीएसएनएलला ७०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये १० मेगाहर्ट्झ आणि ३.६०-३.६७ गीगाहर्ट्झ बँडमध्ये ७० मेगाहर्ट्झ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याशिवाय तो पुढे नेण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.
(आणखी वाचा : BSNL Recharge Plan: Jio आणि Airtel ला टक्कर देण्यासाठी BSNL ने लाँच केला सर्वात स्वस्त Plan!)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीएसएनएलला ७०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये १० मेगाहर्ट्झसाठी सुमारे ४०,००० कोटी रुपये आणि ३.६०-३.६७ GHz बँडमध्ये ७० मेगाहर्ट्झसाठी सुमारे २२,००० कोटी रुपये मिळतील. या स्पेक्ट्रम वाटपामुळे BSNL चांगली 5G सेवा प्रदान करू शकेल. विशेष म्हणजे, sub-GHz-GHz बँड विशेषत: टेल्कोला ग्रामीण भागात 5G सेवा देण्यासाठी मदत करेल.तसेच BSNL लवकरच Tata Consultancy Services च्या नेतृत्वाखालील संघाच्या मदतीने भारतात 4G सेवा सुरू करणार आहे, ज्यात Tejas Network आणि Center for Development of Telematics यांचा समावेश आहे.
BSNL ची 5G सेवा कधी सुरु होणार?
तज्ज्ञांचे मत आहे की, ७०० मेगाहर्ट्झ बँडमधील १० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम एअरटेलसाठी योग्य आहे कारण ग्रामीण भागात 5G प्रदान करण्यासाठी ते महत्त्वपूर्ण असेल. रिलायन्स जिओने देशभरातील ७०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये १० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम घेण्यासाठी ३९,२७० कोटी रुपये खर्च केले. BSNL चे 5G ऑगस्ट २०२३ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.