भारती एअरटेल ही भारतातील सर्वात मोठी दुसरी टेलिकॉम कंपनी आहे. एअरटेल कंपनीने देशातील अनेक शहरांमध्ये आपले ५जी नेटवर्क सूरू केले आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन्स लॉन्च करत असते. ज्यामध्ये अनेक फायदे ग्राहकांना मिळत असतात. भारती एअरटेल आपल्या डेटा व्हाउचर विभागांतर्गत ग्राहकांना १४८ रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे. एअरटेलद्वारे ऑफर केलेले डेटा व्हाउचर केवळ डेटा प्लॅनसह येतात. यामध्ये व्हॉइस कॉलिंग किंवा एसएमएस आणि वैधतेचे फायदे देखील मिळत नाहीत. डेटा व्हाऊचरपैकी तुमच्याकडे एक बेस प्रीपेड प्लॅन असणे आवश्यक आहे.
Bharti Airtel : १४८ रुपयांचा प्लॅन
भारती एअरटेलच्या १४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना १५ जीबी डेटा मिळतो. हा एक बल्क प्रमाणात डेटा आहे. वापरकर्त्यांचा बेस प्लॅन संपेपर्यंत हा प्लॅन उपलब्ध असणार आहे. हा असा एक प्लॅन आहे की वापरकर्ते त्यांची दैनंदिन डेटाची मर्यादा वाढवण्यासाठी हा प्लॅन खरेदी करतात . मात्र एअरटेलच्या १४८ रुपयांच्या डेटा व्हाऊचरसह वापरकर्त्यांना Airtel Xstream Play चा फायदा देखील मिळतो. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
हेही वाचा : Tech Tips: परदेशात प्रवास करताना UPI पेमेंट कसे करायचे? ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स
एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले हे एक ओटीटी कंटेंट प्लॅटफॉर्म आहे. एअरटेल खरोखरच स्वतःचे टीव्ही शो किंवा चित्रपट तयार करत नाही. परंतु Xstream Play प्लॅटफॉर्मवर त्याचे चित्रपट आणि टीव्ही शो प्रदर्शित करण्यासाठी भिन्न OTT प्लॅटफॉर्म प्रदान करते. Xstream Play Premium ग्राहकांना १५ पेक्षा जास्त OTT वरून कंटेंट पाहण्याची परवानगी देते.
यामध्ये Lionsgate Play, SonyLIV Premium, Eros Now, Hoichoi आणि अन्य प्लॅटफॉर्म ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. १४८ रुपयांचा प्लॅन ग्राहकांना २८ दिवसांसाठी Airtel Xsrtream Play Premium वर मोफत प्रवेश देते. Airtel कडून आणखी प्रीपेड प्लॅन आहेत जे Airtel Xstream Play Premium सह येतात. परंतु ते सर्व डेटा व्हाउचर नाहीत.
हेही वाचा : लवकरच बाजारात येणार iPhone 15; कधी होणार लॉन्च? काय आहे किंमत? जाणून घ्या सविस्तर माहिती
एअरटेलच्या डेटा व्हाउचर प्लॅन्समध्ये १४९ रुपयांचा आणखी एक प्लॅन येतो. जो irtel Xstream Play Premium सह येतो. ज्यामध्ये १ जीबी डेटा आणि ३० दिवसांच्या वैधतेसह येतो.