Bharti Airtel ही भारतातील सर्वात मोठी दुसरी टेलिकॉम कंपनी आहे. एअरटेलने रिलायन्स जिओनंतर आपले ५जी नेटवर्क सुरू केले आहे. देशातील अनेक शहरांमध्ये ५जी नेटवर्क सुरु केले आहे. तसेच कंपनी आपल्या ग्राहकांसाठी काही नवनवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स लॉन्च करत असते. आज आपण एअरटेल टेलिकॉम ऑपरेटरद्वारे ऑफर करण्यात आलेल्या काही प्रीमियम प्रीपेड प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत. लक्षात घ्या की भारती एअरटेल देशाच्या प्रत्येक भागात 5G आणण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर आहे.
भारती एअरटेलचे १ हजार रुपयांवरील प्रीपेड प्लॅन्स
Airtel चा १,७९९ रुपयांचा प्लॅन: एअरटेलचा १,७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स, ३,६०० एसएमएस आणि २४ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता एक वर्षासाठी असणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये Apollo 24|7 सर्कल, मोफत हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिकचे अतिरिक्त फायदे मिळतात. ज्यांना दीर्घकालीन वैधता हवी आहे मात्र डेटा जास्त लागत नाही अशा वापरकर्त्यांसाठी हा प्लॅन फायदेशीर ठरतो. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
Airtel चा २,९९९ रुपयांचा प्लॅन: एअरटेलच्या २,९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना एक वर्षाची वैधता मिळते. त्यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स, दररोज २ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएस व अनलिमिटेड ५ जी डेटा ऑफर केला जातो. तसेच या प्लॅनमध्ये Apollo 24|7 सर्कल, मोफत हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिकचे अतिरिक्त फायदे मिळतात.
Airtel चा ३,३५९ रुपयांचा प्लॅन: एअरटेलचा ३,३५९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोजचे १०० एसएमएस आणि अनलिमिटेड ५जी डेटा ऑफर केला जातो. डिस्नी + हॉटस्टार मोबाइलचे १ वर्षासाठी तसेच मोफत हॅलोट्यून्स आणि मोफत विंक म्युझिकचे फायदे मिळतात.