भारती एअरटेल ही भारतातील सर्वात मोठी दुसरी टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओनंतर या कंपनीने आपले ५जी नेटवर्क सुरू केले असून देशातील अनेक शहरांमध्ये ते सुरू करण्यात आले आहे. भारती एअरटेलकडे अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत. ज्यात वापरकर्त्यांना अनेक फायदे मिळतात. तसेच कंपनीकडे ग्राहकांसाठी ३५ दिवसांची वैधता असणारा प्लॅन देखील उपलब्ध आहे.
त्याशिवाय, वापरकर्त्यांना अतिरिक्त डेटाची गरज असल्यास ते डेटा व्हाउचर देखील रिचार्ज करू शकतात. तसेच हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे की या प्लॅनची किंमत २३९ रुपयांपेक्षा अधिक आहे. मात्र हा प्लॅन ५जी अनलिमिटेड डेटासाठी पात्र नसणार आहे. हा प्लॅन किती रुपयांचा आणि आणि त्यात मिळणारे फायदे कोणकोणते आहेत ते जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
हेही वाचा : WhatsApp Features: व्हॉट्सअॅपची ‘ही’ ५ फीचर्स वापरून पाहिलीत का? एकतर आहे खूप कामाचे
भारती एअरटेलचा २८९ रूपयांचा प्लॅन
एअरटेलचा २८९ रुपयांचा प्लॅन हा ४ जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह येतो. यात मिळणार ४ जीबी डेटा हा दररोज नसून तो एकूण ४ जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. तथापि, तुम्ही वैधता मिळणाऱ्या ऑफरच्या शोधात असाल आणि तुम्ही तुमच्या डेटाची गरज पूर्ण करण्यासाठी मुख्यतः वाय-फाय नेटवर्कवर अवलंबून असाल तर हा एक चांगला प्लॅन आहे. हा मूळ प्रीपेड प्लॅन आहे. तुम्हाला अतिरिक्त डेटा हवा असल्यास तुम्ही या वरच्या इतर डेटा व्हाउचरसह रिचार्ज देखील करू शकता.
एअरटेल या प्लॅनमध्ये अनलिमिटेड ५जी डेटा ऑफर करत नाही. २८९ रुपयांच्या प्लॅनमडीझये वापरकर्त्यांना एसएमएस करण्याचा फायदा मिळतो. त्यात एकूण ३०० एसएमएसचा समावेश आहे. तसेच अपोलो 24|7 सर्कल, मोफत हेलोट्यून्स आणि विंक म्युझिक यासह अतिरिक्त फायदे मिळतात. मात्र जर का तुम्हाला अधिक डेटा आणि कमी वैधता हवी असेल तर तुम्ही २९६ रुपयांचा प्लॅन देखील घेऊ शकता. ज्यात २५ जीबी डेटा आणि इतर फायदे व अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळते. या प्लॅनची वैधता ३० दिवस इतकी आहे.