भारती एअरटेल ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे. टेलिकॉम कंपनी एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन्स ऑफर करत अनेक फायदे ग्राहकांना मिळतात. आता ज्या ग्राहकांना काही दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा आहे त्या ग्राहकांना रिचार्ज प्लॅनची चिंता करण्याची गरज नाही. एअरटेल कंपनीकडे असे अनेक प्लॅन्स आहेत जे तुम्हाला काही कालावधींसाठी फायदेशीर ठरणार आहेत. हे रिचार्ज पॅक १८० पेक्षा जास्त देशांमध्ये वापरता येऊ शकतात. ज्यांना दोन भागांमध्ये विभागले आहे.

जर का तुम्ही एखाद्या बाहेरच्या देशात फिरायला जायचा विचार करत असाल किंवा त्याबाबत काही योजना ठरवत असाल तर एअरटेलने आपल्या प्लॅन्समध्ये काही प्रीपेड आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्सचा समावेश केला आहे. एअरटेलकडे कोणकोणते आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्स आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
Zee Marathi Lakshmi Niwas Serial New Entry
Video : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री! साकारणार ‘ही’ भूमिका, जबरदस्त प्रोमो आला समोर
indian express thinc our cities event
सहज, स्वस्त तंत्रज्ञानाची गरज ; इंडियन एक्सप्रेसच्या ‘थिंक – सिटीज’ परिसंवादात तज्ज्ञांचे मत
Image of an airplane
Surat Bangkok Flight : सुरतहून बँकॉकला गेलेल्या पहिल्याच विमानात प्रवासी प्यायले दोन लाखांची १५ लिटर दारू
Paaru
Video: पारू-आदित्यमधील जवळीक वाढणार, अनुष्का दोघांची अहिल्याकडे तक्रार करणार, पाहा प्रोमो
Pankaj Tripathi
पंकज त्रिपाठी दशावतार लोककला कोकणातल्या ‘या’ गावी शिकले; अनुभव सांगत म्हणाले, “मुंबईत येण्याआधी नशिबाने…”

हेही वाचा : बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, Oppo चा नवा फोल्डेबल स्मार्टफोन देशात दाखल, पहिल्या सेलमध्ये ‘इतक्या’ रुपयांची सूट

एअरटेलचा १ दिवसांचा इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन

एअरटेलच्या आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्समधील एन्ट्री लेव्हल प्लॅनची किंमत ही ६४९ रूपये आहे. यामध्ये वापरकर्त्यांना १०० मिनिटांपर्यंत मोफत आउटगोइंग कॉल, इनकमिंग कॉल आणि भारतात कॉल करणे असे फायदे मिळतात. तसेच या प्लॅनमध्ये १० मोफत एसएमएस आणि ५०० एमबी मोफत डेटा देखील मिळतो. या प्लॅन्समध्ये कंपनीकडे आणखी एक प्लॅन आहे जो कमी कालावधीच्या प्रवासासाठी फायदेशीर आहे.

एअरटेलचा १० दिवसांचा इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन

एअरटेलकडे १० दिवसांचा देखील आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन आहे. ज्याची वैधता १० दिवस इत्तक्की आहे. तेसच या प्लॅनची किंमत ८९९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये १०० मिनिटांपर्यंत मोफत लोकल कॉल्स, आऊट गोइंग – इनकमिंग कॉल्स आणि भारतात कॉल करणे असे फायदे समाविष्ट आहेत. तसेच या प्लॅनमध्ये २० मोफत एसएमएस , १ जीबी हाय -स्पीड डेटा ऑफर केला जातो. तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान देखील एअरटेल थँक्स अ‍ॅपाच वापर करून तुमच्या प्लॅनच्या वापरावर लक्ष ठेव शकता.

Story img Loader