भारती एअरटेल ही देशातील दुसऱ्या क्रमांकांची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओनंतर एअरटेल कंपनीने देशातील अनेक ठिकाणी ५ जी नेटवर्क सुरु केले आहे. तसेच कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स लॉन्च करत असते. कंपनीकडे असे दोन प्रीपेड डेटा व्हाउचर आहेत ज्यामध्ये वापरकर्त्यांना Wynk म्युझिकची मोफत सुविधा मिळते. या प्लॅन्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
विंक म्युझिक एक मोफत म्युझिक App आहे. जे iOS डिव्हाइसवर App स्टोअरसह अँड्रॉइड डिव्हाइसवर गुगल प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. जर का तुम्हाला विंक म्युझिकची आवड असेल तर तुम्ही या प्लॅन्सच्या माध्यमातून विंक म्युझिक प्रीमियम सबस्क्रिप्शन मोफत मिळवू शकता. या प्लॅन्समध्ये केवळ डेटा आणि विंक म्युझिकचे सबस्क्रिप्शन वापरकर्त्यांना मिळते. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
एअरटेलकडे दोन प्रीपेड डेटा व्हाउचर प्लॅन्स आहेत. ज्यात विंक म्युझिक प्रीमियमचा लाभ मिळतो. या दोन्ही प्लॅन्सची किंमत अनुक्रमे ९८ रुपये आणि ३०१ रुपये आहे. या दोन्ही प्लॅन्समधील फायदे मिळवण्यासाठी तुमच्याकडे बेस सक्रिय प्लॅन असणे आवश्यक आहे. या प्लॅनमध्ये केवळ डेटाचा लाभ मिळतो. एअरटेलच्या ९८ रुपयांच्या प्लॅनची वैधता वापरकर्त्यांच्या बेस प्रीपेड प्लानप्रमाणेच आहे. एअरटेलच्या ९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ५ जीबी डेटा आणि मोफत विंक म्युझिक प्रीमियमची सुविधा मिळते. वापरकर्त्यांचा प्रीपेड प्लॅन संपल्यानंतर विंक म्युझिकची मोफत सुविधा देखील समाप्त होईल.
एअरटेलच्या ३०१ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ५० जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता देखील वापरकर्त्यांच्या बेस प्रीपेड प्लॅनप्रमाणेच आहे. वापरकर्त्यांचा प्रीपेड प्लॅन संपल्यानंतर विंक म्युझिकची मोफत सुविधा देखील समाप्त होईल. ज्या वापरकर्त्यांना पुन्हा मोफत विंक म्युझिकची सुविधा हवी आहे ते पुन्हा या दोन प्लॅन्सपैकी त्यांना हवा तो प्लॅन रिचार्ज करू शकतात.