भारती एअरटेल ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओनंतर एअरटेलने देशामध्ये आपले ५ जी नेटवर्क लॉन्च केले आहे. एअरटेलकडे असे काही रिचार्ज प्लॅन्स आहेत, ज्यामध्ये वापरकर्त्यांना दररोज २ जीबी डेटा आणि इतर अतिरिक्त फायदे देखील मिळतात. एअरटेलकडे असे दोन प्लॅन्स आहेत ज्यामध्ये वापरकर्त्यांना दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. तसेच या प्लॅन्सची वैधता १ महिन्यासाठी असणार आहे. या दोन प्लॅन्सच्या किंमती, २ जीबी डेटा शिवाय आणखी कोणकोणते फायदे यात मिळतात, त्या बद्दल जाणून घेऊयात.
एअरटेलचा ३१९ रूपयांचा ट्रूली अनलिमिटेड प्लॅन
एअरटेलच्या ३१९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा वापरकर्त्यांना मिळतो. तसेच या प्लॅनची वैधता १ महिना इतकी आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग ज्यामध्ये लोकल, एसटीडी आणि रोमिंग यांचा समावेश आहे. दररोज २ जीबी डेटा वापरून संपल्यानंतर याचा स्पीड ६४ kbps पर्यंत कमी होतो. तसेच तुम्हाला या प्लॅनमध्ये एअरटेल थँक्स रिवॉर्ड्सचा एक भाग म्हणून एअरटेलचा अनलिमिटेड ५जी डेटा, कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ३ महिन्यांसाठी अपोलो 24|7 चे सबस्क्रिप्शन, विंक म्युझिक आणि मोफत हॅलोट्यून्सचे फायदे देखील या प्लॅनमध्ये मिळतात. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
हेही वाचा : पासवर्ड लक्षात राहत नाही? व्हॉट्सअॅपने लॉन्च केले PassKey फिचर; जाणून घ्या
एअरटेलचा ३५९ रूपयांचा ट्रूली अनलिमिटेड प्लॅन
जर का तुम्हाला रिचार्ज प्लॅनसह ओटीटीचे फायदे शोधू इच्छित असाल तर, तर एअरटेलकडे ३५९ रुपयांचा एक रिचार्ज प्लॅन आहे. ज्यामध्ये एअरटेल एक्सट्रीम प्ले चा समावेश देखील आहे. ज्यामध्ये १५ पेक्षा अधिक ओटीटी सेवांचा फायदा मिळतो. ज्यामध्ये सोनी लिव, Lionsgate प्ले, फॅनकोड, Eros Now, होईचोई (hoichoi), मनोरमामॅक्स (ManoramaMAX) आणि अन्य प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. एअरटेलच्या ३५९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा वापरून संपला की त्याचा स्पीड ६४ kbps पर्यंत कमी होतो.
तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि ५ रुपयांचा टॉकटाईमचा समावेश या प्लॅनमध्ये आहे. तसेच तुम्हाला या प्लॅनमध्ये एअरटेल थँक्स रिवॉर्ड्सचा एक भाग म्हणून एअरटेलचा अनलिमिटेड ५जी डेटा, कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ३ महिन्यांसाठी अपोलो 24|7 चे सबस्क्रिप्शन, विंक म्युझिक आणि मोफत हॅलोट्यून्सचे फायदे देखील या प्लॅनमध्ये मिळतात.