भारतामध्ये Airtel ही एक लोकप्रिय टेलिकॉम कंपनी आहे. एअरटेलने देशातील अनेक शहरांमध्ये आपले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. तसेच ग्राहकांसाठी सतत नवनवीन पोस्टपेड व प्रीपेड रिचार्ज प्लॅन एअरटेल लॉन्च करत असते. आतासुद्धा कंपनीने एक नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. त्यात ग्राहकांना कोणकोणते फायदे मिळणार आहेत ते पाहुयात.
भारती एअरटेलने आपला २८९ रुपयांचा नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. यामध्ये वापरकर्त्यांना ३५ दिवसांची वैधता मिळते. तसेच यामध्ये तुम्हाला ४ जीबी डेटा, ३०० एसएमएस आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचे फायदे मिळतात. यामध्ये एअरटेल थँक्सचा फायदा मिळतो. तसेच Apollo 24|7 सर्कल , मोफत हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिक मोफत मिळते. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
एअरटेलने लॉन्च केलेला हा प्लॅन थोडासा वेगळा आहे. कारण इतर कोणतीही टेल्को कंपनी असा प्रीपेड प्लॅन ऑफर करत नाहीत. हा प्लॅन खरेदी केल्यास याचा रोजच्या वापराचा खर्च केवळ ८.२५ रूपये आहे.
एअरटेलचा असाच एक १९९ रूपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ३० दिवसांची वैधता मिळते. यामध्ये २८९ रूपयांच्या प्लानप्रमाणेच कंपनी फायदे देते. ३ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स आणि ३०० एसएमएस करण्याचे फायदे मिळतात. १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये प्लॅन वापरण्याचा रोजचा खर्च ६.६३ रुपये इतका आहे.
वापरकर्ते त्यांच्या गरजेनुसार, २८९ रू. , किंवा १९९ रूपयांचा प्लॅन खरेदी करू शकता. भारती एअरटेल देशातील प्रत्येक भागामध्ये आपले ५जी नेटवर्क वेगाने सुरू करत आहेत. तसेच अनलिमिटेड ५ डेटा वापरण्याची परवानगी देत आहे. जर का तुम्ही २३९ किंवा त्याहून अधिक किंमतीचा प्रीपेड प्लॅन खरेदी केल्यास तुम्हाला एअरटेलकडून अनलिमिटेड ५जी डेटा प्राप्त होऊ शकतो.