Airtel ही देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओनंतर एअरटेलने देशात आपले ५जी नेटवर्क सुरु केले आहे. तसेच कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन प्लॅन्स लॉन्च करत असते. आता कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी ९९ रुपयांचा अनलिमिटेड डेटा पॅक लॉन्च केला आहे. या हालचालीच्या पार्श्‍वभूमीचा विचार केल्यास, एअरटेल एकाच वेळी ग्राहकांसाठी अनुकूल दर पर्याय ऑफर करण्यासाठी आणि ARPU (प्रति वापरकर्ता सरासरी महसूल) वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे पावले उचलताना दिसत आहे. एअरटेरलने २०० रुपयांचा ARPU गाठला आहे.

जेव्हा वापरकर्ते त्यांच्या प्लॅनसह हाय-स्पीड डेटाचा कोटा संपवतात तेव्हा हा डेटा पॅक लागू होतो. एअरटेल ARPU वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या धोरणाचा एक भाग म्हणून एअरटेल कंपनीने ९९ रुपयांचा डेटा पॅक लॉन्च केला आहे. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

Mumbai Municipal Corporation Debris on Call service for household level construction waste collection goes online Mumbai
घरगुती स्तरावरील बांधकामाचा कचरा वाहून नेण्यासाठी मुंबई महापालिकेची ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवा ऑनलाईन
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
mobile transport officer stolen Mumbai, mobile stolen Mumbai,
मुंबई : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवला
Bharti Airtel Indias first spam fighting network
Spam Fighting Solution :Airtel चं पहिलं AI नेटवर्क सोल्युशन! सर्वाधिक स्पॅम कॉल, मॅसेज मुंबई आणि दिल्लीमध्येच; वाचा, सविस्तर रिपोर्ट
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
PAN 2 0 is going Digital Will you still need a physical PAN card as ID proof and KYC document
PAN 2.0 आता डिजिटल होणार: अजूनही फिजिकल PAN कार्डची गरज भासेल का?
Mumbai subway metro, subway metro passengers Mumbai , Mumbai metro,
भुयारी मेट्रोकडे मुंबईकरांची पाठ, दुसऱ्या महिन्यात प्रवासी संख्येत ६८ हजारांहून अधिकने घट

हेही वाचा : Airtel च्या ‘या’ ८४ दिवसांच्या प्लॅनमध्ये युजर्सना मिळणार दररोज २ जीबी डेटा आणि OTT चे फायदे

एअरटेलचा ९९ रुपयांचा डेटा पॅक

एअरटेल ९९ रूपये डेटा पॅक ग्राहकांना १ दिवसाची वैधता मिळते. तसेच अनलिमिटेड डेटा ऑफर करतो. तथापि, ३० जीबी चे योग्य वापर धोरण (FUP) लागू होते. ३० जीबी हाय-स्पीड डेटा वापरल्यानंतर एअरटेल वापरकर्ते ६४ KBps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा वापरू शकतात. कृपया लक्षात घ्या की या डेटा पॅकचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे सक्रिय बेस प्लॅन असणे आवश्यक आहे.

एअरटेल कंपनीने नुकताच ८४ दिवसांची वैधता असणारा ८३९ रुपयांचा प्लॅन लॉन्च केला आहे. त्यात ग्राहकांना कोणकोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊयात.

एअरटेलचा ८३९ रूपयांचा प्लॅन

एअरटेलचा ८३९ रुपयांचा प्लॅन आहे ज्यात ८४ दिवसांची वैधता आणि दररोज २ जीबी डेटा वापरायला मिळतो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करण्याचे फायदे मिळतात. तसेच अनलिमिटेड ५जी डेटा , Apollo 24|7 Circle, मोफत Hellotunes, Wynk Music आणि RewardsMini सबस्क्रिप्शन सारखे फायदे देखील मिळतात.

याशिवाय, दोन प्रमुख OTT ओव्हर-द-टॉप) प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. त्यात डिस्नी + हॉटस्टार मोबाइल ३ महिन्यांसाठी आणि एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले ८४ दिवसांसाठी मिळते. एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले सबस्क्रिप्शनसह, वापरकर्ते एकाच लॉग इनमध्ये १५ पेक्षा जास्त ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटमध्ये प्रवेश मिळवू शकतात.या प्लॅनसह ग्राहकांना मिळणारा एअरटेलचा अनलिमिटेड ५जी डेटा ऑफर त्या वापरकर्त्यांसाठी आहे जे एअरटेल ५जी कव्हरेज अंतर्गत येते. याशिवाय वापरकर्त्यांना पहिल्यांदा आपल्या एअरटेल थँक्स अकाउंटमध्ये जाणे आवश्यक आहे. अमर्यादित 5G डेटा लाभ मिळविण्यासाठी पात्र असलेल्या प्रीपेड प्लॅनसह वापरकर्त्याने प्रत्येक वेळी हे करणे आवश्यक आहे.

Story img Loader