Reliance Jio, Airtel आणि Vi या देशातील तीन आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. या कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. या कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी ब्रॉडबँड कनेक्शन सुद्धा ऑफर करतात. जर का तुमच्याकडे एअरटेलचे ब्रॉडबँड कनेक्शन असेल किंवा तुम्ही ते ब्रॉडबँड कनेक्शन विकत घेण्याचा विचार करत असाल तर एअरटेल कंपनी देत असलेले फायदे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

एअरटेल कंपनीने देशातील अनेक शहरांमध्ये आपली ५ जी सेवा सुरू केली आहे. जर का तुम्ही या कंपनीचे ब्रॉडबँड कनेक्शन वापरत असाल तर किंवा घेण्याचा विचार करत असाल तर एअरटेल ब्रॉडबँड कनेक्शन प्लॅनमध्ये १५ टक्क्यांची बचत करू शकता. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

हेही वाचा : खूशखबर! आता पर्सनल चॅट्स दुसऱ्यांपासून लवपता येणार, WhatsApp ने लॉन्च केलेले ‘हे’ फिचर एकदा पाहाच

एअरटेलच्या प्लॅनवर १५ टक्क्यांची सूट

एअरटेलच्या प्लॅनवर मिळणारी १५ टक्क्यांची सूट मिळवण्याकरता सर्वात महत्वाचे म्हणजे या ऑफरचा फायदा तुम्हाला तेव्हाच मिळणार आहे जेव्हा तुम्ही ६ किंवा १२ महिन्यांचा रिचार्ज प्लॅन खरेदी कराल. टेलीकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार या ऑफरमध्ये तुम्ही ६ महिन्यांचा प्लॅन खरेदी केला तर त्यामध्ये तुम्हाला ७.५ टक्क्यांची सूट मिळणार आहे. तसेच १२ महिन्यांचा प्लॅन खरेदी केल्यास १५ टक्क्यांची सूट मिळत आहे. यामध्ये महत्वाची बाब अशी आहे की ही सूट मिळवण्यासाठी तुम्हाला ४९९ रुपयांच्या वरील प्लॅन खरेदी करावा लागू शकते.

तुम्ही जर का तीन महिन्यांचा प्लॅन एकाच वेळी रिचार्ज केल्यास त्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फायदा मिळणार नाही. ही डिस्काउंट ऑफर फक्त ६ किंवा १२ महिन्याच्या प्लॅनच्या खरेदीवरच मिळणार आहे. यामध्ये ७९९, ९९९, १,४९९ आणि २,४९८ व ३,९९९ रुपयांच्या प्लॅनचा समावेश होतो. जरी एअरटेलच्या सर्व प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा उपलब्ध आहे, परंतु हे सर्व प्लॅन ३.३ TB डेटा (प्रति महिना) FUP लिमिटसह येतात.

हेही वाचा : Reliance Jio च्या ‘या’ रिचार्ज प्लॅनला मिळतेय ग्राहकांची सर्वाधिक पसंती; दररोज ३ जीबी डेटा आणि…, जाणून घ्या

एअरटेल ३ महिने , ६ महिने आणि १२ महिन्यांचा प्लॅनची निवड करणाऱ्या वापरकर्त्यांकडून इन्स्टॉलेशनचे १,५०० रुपये चार्ज करणार नाही. जर का तुम्ही एअरटेलचे नवीन ब्रॉडबँड कनेक्शन घेत असाल आणि त्यामध्ये तुम्ही एक महिन्याचा प्लॅन निवडला तर तुम्हाला १,५०० रुपयांचे इन्स्टॉलेशन इन्स्टॉलेशन चार्जेस द्यावे लागणार आहेत.

Story img Loader